Compost Fertilizer

Compost Fertilizer । सोप्या पद्धतीने करा घरच्या घरी कंपोस्ट खत, कसं ते जाणून घ्या

सेंद्रीय शेती

Compost Fertilizer । भारतात मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाते. अलीकडच्या काळात तरुणवर्गदेखील लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. सध्या पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती केली जात आहेत. शेतीमध्ये सर्वात महत्त्वाची आहेत ती म्हणजे खते. (Fertilizer) मोठ्या प्रमाणात जर खतांचा वापर केला तर पिके देखील जोमाने येतात. परंतु, काही शेतकरी रासायनिक खतांचा (Chemical fertilizers) वापर करत आहेत.

Crop Loan Subsidy । शेतकऱ्यांवर अन्याय, पीक कर्जाची नियमीत परतफेड करूनही मिळाले नाही अनुदान

याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. इतकेच नाही तर जमिनीची देखील हानी होत आहे. या सर्वांचा विचार करता काही शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करत आहेत. सेंद्रिय खतांमुळे (Organic fertilizers) जमिनीचे आरोग्य सुधारते आणि पिकांना देखील त्याचा फायदा होतो. शेणखत, कंपोस्ट खत तसेच गांडूळ खते सर्रास वापरली जात आहेत. आता तुम्ही कंपोस्ट खत घरच्या घरी तयार करू शकता. (Compost Making)

Bull price hike । बैलांची किंमत पोहोचली लाखांच्या घरात, खरेदीसाठी तुफान गर्दी

लक्षात ठेवा या गोष्टी

जनावरांपासून जे काही शेण मिळते ते शेण खड्डा पद्धतीने शेतकरी साठवून ठेवतात. पावसाळ्याच्या दिवसापूर्वी ते जसेच्या तसे ते शेतात टाकतात. समजा त्या शेणखताचे (Compost Fertilizer Making) व्यवस्थित न विघटन झाल्यामुळे शेणाचे गोळे शिल्लक राहतात. याचा दुष्परिणाम तर होतो शिवाय अपेक्षित परिणाम देखील मिळत नाही. यामुळे हुमणी अळी तयार होते, जी शेतीसाठी त्रासदायक असते.

Agricultural Loans । शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती

कल्चरचा करा वापर

जर तुम्ही यासाठी कल्चरचा वापर केला तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. एक लिटरचे कल्चर 100 लिटर पाण्यात मिसळून ते चांगले हलवून घ्यावे. त्यानंतर शेणखताच्या खड्ड्यात एका लाकडी काडीने होल करा. या होलात कल्चरयुक्त पाणी सोडा. हा शेणखताचा खड्डा काडीकचऱ्याने झाकून ठेवून त्यावर अधून मधून पाणी शिंपडा. साधारणपणे 40 दिवस झाल्यानंतर चांगल्या दर्जेदार कंपोस्ट खत तयार होते.

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता सरसकट शेतकऱ्यांना घेता येणार विहिरीचा लाभ

याशिवाय तुम्ही धान्यापासून देखील कंपोस्ट खत तयार करू शकता. तसेच तुम्ही कंपोस्ट खतासाठी पाने , देठ, झाडांचा पालापाचोळा, मलमूत्र, शेतातील तण, गोठ्यातील वाया गेलेला चारा, पिकाची धसकटे, भाज्यांचे टाकाऊ भाग, पेंढा इत्यादी टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचा देखील कंपोस्ट खतांसाठी वापर करू शकता. यामुळे जमिनीची कस वाढून पीक चांगल्या प्रकारे येईल.

Success Story । चर्चा तर होणारच! मन रमत नाही म्हणून सोडली पोलिसाची नोकरी, आज तूर शेतीतून करतोय लाखोंची कमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *