Crop Loan Subsidy

Crop Loan Subsidy । शेतकऱ्यांवर अन्याय, पीक कर्जाची नियमीत परतफेड करूनही मिळाले नाही अनुदान

बातम्या

Crop Loan Subsidy । शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाचा फटका बसत असल्याने त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. काही शेतकऱ्यांना हे नुकसान सहन होत नाही त्यामुळे तो आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता सरकार योजना (Government Schemes) सुरु करत असते. परंतु, काही पात्र शेतकऱ्यांना अनुदानापासून (Crop Loan) वंचित राहावे लागल्याचे पाहायला मिळत आहे.

Bull price hike । बैलांची किंमत पोहोचली लाखांच्या घरात, खरेदीसाठी तुफान गर्दी

शेतकरी नाराज

दरम्यान, शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान (Crop Subsidy) म्हणून ५० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना २ टप्प्यात आलेल्या यादीनुसार शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. परंतु तिसऱ्या टप्प्यात पात्र झालेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी सरकारवर नाराज झाले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र दीड हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही.

Agricultural Loans । शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती

शेतकऱ्यांवर अन्याय

डिसेंबर २०१९ मध्ये राज्य सरकारने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदानाची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यात पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. याच कारणामुळे कर्जमाफीपेक्षा प्रोत्साहन अनुदानाचा लाभ सर्वात जास्त होणे अपेक्षित होते.

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता सरसकट शेतकऱ्यांना घेता येणार विहिरीचा लाभ

परंतु, राज्य सरकारच्या परतफेडीच्या कालावधीने जवळपास एक लाख खातेदारांना अनुदानाचा लाभ मिळाला नाही. एप्रिल ते मार्च ही परतफेडीचा कालावधी आहे. विकास संस्थांच्या पातळीवर जूनअखेर पीक कर्जाची परतफेड करण्यात येते. सध्या या जिल्ह्यात उसाचे पीक असून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम एप्रिल, मेपर्यंत सुरू असतो.

Success Story । चर्चा तर होणारच! मन रमत नाही म्हणून सोडली पोलिसाची नोकरी, आज तूर शेतीतून करतोय लाखोंची कमाई

अपात्र शेतकऱ्यांच्या याद्या सहकार विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयाकडे दिल्या आहेत. दरम्यान, एक वर्ष परतफेड केलेले ३६ हजार शेतकरी राज्य सरकारने निर्धारित केलेल्या तीन वर्षांपैकी दोन वर्षे परतफेड करणे अनिवार्य आहे; अपात्र ठरलेल्यांपैकी ३६ हजार शेतकरी हे एक वर्ष परतफेड केलेले आहेत.

Most Expensive Bull । काय सांगता? 41 लाखांचा बैल, दरमहा करतो 2.5 लाखांची कमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *