Agricultural Loans

Agricultural Loans । शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती

बातम्या

Agricultural Loans । राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाने (Rain in Maharashtra) यंदा चांगलीच हुलकावणी दिली आहे, पाऊस नसल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Heavy Rain) पिकांची चांगलीच नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होते. अशावेळी शेतकरी कर्ज (Loan) काढतात.

Government Schemes । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता सरसकट शेतकऱ्यांना घेता येणार विहिरीचा लाभ

परंतु, शेतात काहीच उत्पादन न निघाल्याने शेतकऱ्यांना कर्जाची (Agri Loan) परतफेड करता येत नाही. साहजिकच शेतकरी कर्ज न फेडता आल्याने टोकाचा निर्णय घेतात. धक्कादायक बाब म्हणजे दरवर्षी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशातच आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा आहे. सरकारकडून शेती संबंधित कर्ज वसुलीला स्थगिती (Suspension of loan recovery) देण्यात आली आहे.

Success Story । चर्चा तर होणारच! मन रमत नाही म्हणून सोडली पोलिसाची नोकरी, आज तूर शेतीतून करतोय लाखोंची कमाई

काढले परिपत्रक

राज्य सरकारच्या सहकार आणि पणन विभागाने कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारने 40 दुष्काळी तालुक्यातील 1021 महसुली मंडळातील शेतकऱ्यांच्या शेती संबंधित कर्ज वसुलीस स्थगिती देत कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे काढले आहेत.

Most Expensive Bull । काय सांगता? 41 लाखांचा बैल, दरमहा करतो 2.5 लाखांची कमाई

खरीप-२०२३ हंगामातील कर्जवसुलीस स्थगिती आणि अल्पमुदत पीककर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता दिली असून सार्वजनिक, खासगी, ग्रामीण, लघुवित्त, राज्य सहकारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Mini Tractor Subsidy । आता 90% अनुदानावर करा मिनी ट्रॅक्टर खरेदी, ‘या’ ठिकाणी करा तातडीने अर्ज

‘ही’ आहे अंतिम मुदत

हे लक्षात घ्या की शेतकरी विहित मुदतीत कर्जाची परतफेड करू शकणार नसतील यात बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेऊन खरीप-२०२३ मधील पीककर्जाचे व्याजासह पुनर्गठन केले जाईल. सरकारकडून यासाठी ३० एप्रिल २०२४ ची डेडलाइन देण्यात आली आहे. यानंतर हंगामासाठी कर्ज उपलब्ध होईल. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सहकार आयुक्तांवर सोपविली आहे.

Buffalo Vs jersey cow milk । म्हशीपेक्षा जर्सी गाईचे दूध आरोग्यासाठी का फायदेशीर असते? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *