Buffalo Vs jersey cow milk

Buffalo Vs jersey cow milk । म्हशीपेक्षा जर्सी गाईचे दूध आरोग्यासाठी का फायदेशीर असते? जाणून घ्या

पशुसंवर्धन

Buffalo Vs jersey cow milk । शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी लहान मुलांना दूध (Milk) पिण्याची सवय लावण्यात येते. दुधामध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असे विविध पोषक घटक (Milk benefits) आढळतात. शरीराच्या वृद्धीसाठी दुध खूप फायदेशीर असते. त्यामुळे आपल्याला लहानपणापासून दुधाच्या फायद्याविषयी सांगितलं जाते.

Havaman Andaj । नवंवर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाची दमदार हजेरी, राज्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

काहीजण गाई (Cow milk) म्हशी (Buffalo milk) तर काहीजण जर्सी गाईचे दूध (Jersey cow milk) पितात. पण तुम्हाला माहिती आहे का म्हशीपेक्षा जर्सी गाईचे दूध आरोग्यासाठी जास्त फायदेशीर (Jersey cow milk benefits) असते. अनेकांना ही बाब माहिती नाही. म्हशींना (Buffalo) पान्हा सुटण्यासाठी ऑक्सीटोसीन औषधाच्या इंजेक्शनाचा (Oxytocin drug) वापर केला जातो. धक्कादायक बाब म्हणजे अगदी 5 रुपयांना मिळणारे हे बंदी असलेले औषध 8 ते 10 पटीने जास्त पैसे देऊन खरेदी करण्यात येत आहे.

Crorepati Farmer । एका झटक्यात शेतकरी झाला करोडपती, बँक पासबूक अपडेट केलं आणि…

ऑक्सीटोसीन औषध

पैसे कमावण्याच्या नादात व्यापारीवर्ग आणि काही दूध उत्पादक आता सर्वसामान्यांच्या थेट जीवाशी खेळताना दिसत आहेत. त्यामुळेच म्हशीचे दूध घट्ट व उत्तम असूनही घातक मानले जाते. दरम्यान, जर हे इंजेक्शन वापरले तर अवघ्या पाच मिनिटांच्या आत जनावरांचे सर्व दूध त्याच्या कास आणि स्तनात येते. त्यामुळे पशुपालकांना दूध काढण्यास जास्त वेळ लागत नाही.

Success Story । सैन्यात जाता आले नाही म्हणून केली शेती, आज लाखात करतोय कमाई

शिवाय सामान्य पद्धतीने काढलेल्या दुधापेक्षा जनावरे या पद्धतीने दीड ते दोन लिटर जास्त दूध देतात. वैद्यकांच्या मतानुसार ऑक्सिटोसिन या रसायनामुळे जनावरांच्या प्रजननक्षमतेवर देखील मोठा परिणाम होतो. असे दूध पिल्याने वंध्यत्वाचा धोका निर्माण होतो. लहान मुलांवर याचे गंभीर दुष्परिणाम पाहायला मिळतात. मुली लवकर वयात येण्याची समस्या निर्माण होण्यात या हानिकारक दुधाचा वाटा असल्याचे अनेकांचे मत आहे.

Electricity Price Hike । नवीन वर्षात वीजग्राहकांना महावितरणाचा ‘जोर का झटका’, वीज दरवाढीसह केले जाणार 375 कोटी रुपये वसूल

म्हणून जर्सी गाईचे दूध फायदेशीर

म्हशीमध्ये ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा जास्त वापर होतो. महत्त्वाचे म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे यासाठी कोणतीही तपासणी यंत्रणा नाही. जर्सी गाईमध्ये या औषधाचा वापर तुलनेने खूप कमी होतो. त्यामुळे आता अनेक कुटुंबीय म्हशीपेक्षा जर्शी गाईचे दूध विकत घेतात. हे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. या दुधाला जास्त मागणी असते.

Papaya farming । चर्चा तर होणारच! पपईच्या एका झाडाला लागल्या २०० पेक्षा जास्त पपया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *