Most Expensive Bull

Most Expensive Bull । काय सांगता? 41 लाखांचा बैल, दरमहा करतो 2.5 लाखांची कमाई

बातम्या

Most Expensive Bull । काही ठिकाणी आजही शेतीच्या कामांसाठी बैलाचा (Bull) वापर केला जातो. नांगरणी, पेरणी यांसारखी कामे बैलाच्या मदतीने (Bull uses) करतात. बैलांच्या विविध प्रकारच्या जाती आहेत. शिवाय बैलगाडा स्पर्धेसाठीही बैलांचा वापर करतात. खरंतर बैलगाडा स्पर्धा (Bullock cart competition) सुरु झाल्यापासून बैलांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. अनेक महागडे बैल बाजारात विकायला (Expensive Bull) येतात.

Havaman Andaj । नवंवर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाची दमदार हजेरी, राज्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

41 लाखांचा बैल

पण तुम्ही कधी 41 लाखांचा बैल पाहिला आहे का? सोलापुरच्या कृषी प्रदर्शनात (Solapur Agricultural Exhibition) या बैलाने हजेरी लावली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच बैल (The tallest bull) म्हणून तो ओळखला जातो. सोन्या असे त्याच नाव आहे. त्याची उंची तब्बल ७ फूट आणि 9 फूट लांब आहे. तो सांगली (Sangali) जिल्ह्यातील जत तालुक्यातील बैल आहे. या बैलाची किंमत तब्बल 41 लाख रुपये इतकी आहे.

Buffalo Vs jersey cow milk । म्हशीपेक्षा जर्सी गाईचे दूध आरोग्यासाठी का फायदेशीर असते? जाणून घ्या

चन्नाप्पा आवटी या बैलाची देखभाल करतात. ते सैन्यातून निवृत्त झालेले हवालदार आहेत. विशेष म्हणजे या बैलाचे वजन 1 टनांपेक्षा जास्त आहे. या बैलाला महिन्याला 50 हजारांचा खुराक खातो. चन्नाप्पा आवटी या बैलापासून महिन्याला अडीच लाख रुपयांची कमाई करतात. सोलापुरच्या कृषी प्रदर्शनात (Agricultural Exhibition) या बैलाला पाहण्यासाठी तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Mini Tractor Subsidy । आता 90% अनुदानावर करा मिनी ट्रॅक्टर खरेदी, ‘या’ ठिकाणी करा तातडीने अर्ज

हा बैल ठरतोय चर्चेचा विषय

सध्या सोलापुरात सोन्या बैलाची (Sonya Bull) खूप चर्चा होत आहे. या प्रदर्शनात सोन्या बैल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा बैल दिवसातून दोन लिटर दूध, सात ते आठ अंडी, करडई तेल 200 एमएल, सहा प्रकारचे खाद्य खातो. शिवाय या प्रदर्शनात तब्बल दीड कोटींचा रेडा प्रदर्शनात ठेवला होता. या रेड्याला पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती. दीड कोटीचा रेडा नागरिकही खूप चकित झाले. त्यांनी या रेड्यासोबत फोटो सेशन देखील केलं.

Crorepati Farmer । एका झटक्यात शेतकरी झाला करोडपती, बँक पासबूक अपडेट केलं आणि…

सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासन, सिद्धेश्वर दैवस्थान पंच कमिटी आणि जिल्हा परिषदेच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन केले असून तब्बल तीस एकरात हे कृषी प्रदर्शन भरविले आहे. परंतु या कृषी प्रदर्शनातील सोन्या नावाचा 41 लाखांचा बैल प्रेक्षकांच्या आर्कषणाचे केंद्र ठरत आहे.

Success Story । सैन्यात जाता आले नाही म्हणून केली शेती, आज लाखात करतोय कमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *