Government Schemes । मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतोय. यामुळे पिके धोक्यात येऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होत आहे. काही भागात तर ऐन पावसाळ्याच्या दिवसात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे.
मागेल त्याला योजना
दरम्यान, सरकार सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनांची (Agriculture schemes) सुरुवात करत असते. ज्याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होत असतो. आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या वर्षात ‘मागेल त्याला योजना’ (Agri schemes) हा अभिनव कृषी उपक्रम जास्त प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर सरकारकडून कृषी योजनांसाठीचे सर्व बंधने कडेलोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Most Expensive Bull । काय सांगता? 41 लाखांचा बैल, दरमहा करतो 2.5 लाखांची कमाई
योजनांचा लाभ देण्यासाठी नवीन वर्षात पूर्वीसारखी बंधने अन् उद्दिष्टे नसणार आहेत. याउलट सरसकट शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येईल. असे झाल्याने आता जिल्ह्यातील तळागाळातील शेतकरी समृद्ध होईल. शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादनासाठी भरपूर पाण्याची गरज असते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आता शासनाकडून आर्थिक मदत दिली जात आहे.
Mini Tractor Subsidy । आता 90% अनुदानावर करा मिनी ट्रॅक्टर खरेदी, ‘या’ ठिकाणी करा तातडीने अर्ज
सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित
अशातच आता राज्य सरकारकडून (State Govt) मागेल त्याला विहीर योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. सरकारने नुकतीच सिंचन विहिरींचा कार्यक्रम घेण्यास मंजुरी दिली आहे. सरकारकडून मागेल त्याला विहीर या योजनेंतर्गत जिल्ह्यात जवळपास दीड ते दोन हजार सिंचन विहिरी बनवण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. सरकारने सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित केली आहे.
Buffalo Vs jersey cow milk । म्हशीपेक्षा जर्सी गाईचे दूध आरोग्यासाठी का फायदेशीर असते? जाणून घ्या
पूर्वी समजा 100 शेतकऱ्यांना द्यायचा आहे तर त्यांना पहिले अर्ज दाखल केलेल्या 100 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळायचा. परंतु, आता या योजनेत बदल करण्यात आला आहे. आता मात्र मागेल त्याला योजनेचा लाभ घेता येत आहे. त्यासाठी कृषी विभागास अनलिमिटेड उद्दिष्ट आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला नवीन वर्षात योजनेचा लाभ मिळणार आहे.