Solar pump

Solar pump । शेतकऱ्यांनो, या सरकारी योजनेचा लाभ घेऊन मोफत वापरा वीज, जाणून घ्या योजना

शासकीय योजना

Solar pump । शेतीत विविध बदल होऊ लागले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारदेखील (Government) सतत शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना सुरु करत असते. सध्या अनेक योजनांचा लाभ लाखो शेतकरी घेत आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाचा फटका बसतो. साहजिकच शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येते. अशावेळी या योजना (Government schemes) शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात.

Crop Damages Limit । अवकाळीने झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईबाबत शासनाचा मोठा निर्णय

शेतीमध्ये वीज (Light) खूप महत्त्वाची आहे. वीज नसेल तर पिके जळून जातात. अनेकदा तर पाणी असूनही पिके जळून गेली आहेत. तसेच महाराष्ट्रात वीज जाण्याचे प्रमाण जास्त आहे. अशात नवीन वर्षांपासून विजेच्या दरात वाढ (Increase in electricity rates) झाली आहे. इतकेच नाही तर वीजबिल वसूल करण्यात येत आहे. तुम्ही यातून सुटका करू शकता. सरकारची ही योजना (Solar Kusum Yojna) तुमच्या कामी येईल.

Vegetable rate । ट्रक चालकांच्या संपाचा मोठा परिणाम, भाज्यांचे दर एका रात्रीत झाले दुप्पट

कुसुम योजना

कुसुम योजना यापैकीच एक आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप बसवण्यासाठी ६० टक्के अनुदान देण्यात येत आहे. शेतकऱ्यांशिवाय हे पंप पंचायती आणि सहकारी संस्थांनाही मोफत उपलब्ध करून दिले जातात. त्यांच्या शेतात सोलर पंप उभारण्यासाठी सरकार किमतीच्या ३० टक्के कर्ज देत आहे. त्यामुळे या प्रकल्पावर शेतकऱ्यांना केवळ दहा टक्केच खर्च करावा लागतो. या योजनेतून शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो. शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक किंवा डिझेल पंपाने सिंचनावर जास्त पैसे देखील खर्च करावे लागतात.

Agricultural Loans । मोठी बातमी! कृषी कर्ज वसुलीसाठी महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

महत्त्वाची कागदपत्रे

  • शेतकऱ्याचे शिधापत्रिका
  • आधार कार्ड
  • शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे तपशील

Desi jugad । शेतकऱ्यांच्या जुगाडापुढे इंजिनिअरही फेल, नदी पार करण्यासाठी बनवली बोट

जाणून घ्या फायदे

  • सोलर पंपामुळे शेतीसाठी वीज लागत नाही, शेतकऱ्यांना वीज बिलातून दिलासा मिळतो.
  • सौरपंपांची किंमत कमी असून त्यांची देखभालही सोपी आहे.
  • सौरपंप पर्यावरणासाठीही फायदेशीर आहेत, कारण ते प्रदूषण करत नाहीत.

Compost Fertilizer । सोप्या पद्धतीने करा घरच्या घरी कंपोस्ट खत, कसं ते जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *