Crop Insurance । शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. दरवर्षी शेतमालाला योग्य भाव मिळतोच असे नाही. अनेकदा शेतकरी कर्ज (Agri loan) न फेडता आल्याने टोकाचा निर्णय घेतात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government schemes) सुरु केल्या आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) होय. लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.
Farmers Protest । शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केले कलम 144, इंटरनेट सेवाही बंद
शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमळनेर तालुक्यातील पातोंडा मंडळातील वंचित असणाऱ्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम (Crop Insurance Amount) जमा होण्यास सुरुवात झाली असून या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. पण अजूनही चोपडा, जळगाव आणि जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळाला नाही.
Potato Price । बापरे! अमेरिकेतील 1 किलो बटाट्याची किंमत जाणून तुम्हीही व्हाल चकित
यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून हे शेतकरी रक्कमेच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, याबाबत विमा कंपनीच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे, “आम्ही लवकरच चोपडा, जळगाव आणि जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा परतावा जमा करणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देत असून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”
Ritha Farming । शेतकरी बंधुनो, ‘या’ झाडांची लागवड करून एकरात मिळवा 10 लाखांचं उत्पन्न
पातोंडा मंडळातील पाच हजार शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले होते. त्याबाबत मंत्री अनिल पाटील यांच्याकडे फिर्याद मांडली असता मंत्री पाटील यांनी त्याबाबत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर आता पातोंडा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर हेक्टरी साडेआठ हजार रुपयांप्रमाणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Cotton Rate । कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त, पेटवून दिली कापसाने भरलेली गाडी