PM Kisan Yojana

PM Kisan Yojana । सरकारकडून दिवाळीआधी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होतील ‘इतके’ पैसे

शासकीय योजना

PM Kisan Yojana । केंद्र सरकारकडून गरीब आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पीएम किसान योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) 2019 पासून सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर या योजनेद्वारे वर्षांतून सहा हजार रुपयांची मदत जमा होते. आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आता 15 व्या हप्त्याची (PM Kisan Samman Nidhi Yojana 15th installment) आतुरतेने वाट पाहत आहेत.

Havaman Andaj । ऐन थंडीत अवकाळी पावसाचा कहर! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

15 व्या हप्त्याची तारीख ठरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या हप्त्याचे (PM Kisan) पैसे 14 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात. दरम्यान गेल्या हप्त्यांमध्ये पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली होती. ज्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या नोंदींची पडताळणी, केवायसी केली नव्हती त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेता आला नव्हता.

Maharashtra Drought । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ९५९ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

त्यामुळे जर तुम्हीही अजून जमिनीच्या नोंदींची पडताळणी, केवायसी केली नसेल तर आजच करून घ्या. नाहीतर तुम्हाला या योजनेच्या हप्त्याचा लाभ घेता येणार नाही. सरकारने देखील ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर ज्या शेतकऱ्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून देखील पैसे माघारी घेतले जात आहेत.

Post Monsoon Rain । अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान

अधिक माहितीसाठी ‘या’ ठिकाणी साधा संपर्क

जर तुम्हाला पीएम किसान योजनेची अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही pmkisan-ict@gov.in वर ईमेल आयडी पाठवू शकता. पीएम शेतकरी योजना हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या नंबरवर देखील संपर्क साधू शकतात.

Agricultural University । हे आहे देशातील पहिले कृषी विद्यापीठ, कधी आणि कोठे स्थापन झाले जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *