Sarkari Yojna । कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. यासाठी सरकारकडून विविध योजना देखील राबविण्यात आलेल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या एका विशेष योजनेबद्दल माहिती दिली होती.
Success Story | डाळिंबाची शेती करून तरूण शेतकऱ्याने कमावले कोट्यवधी रुपये!
या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून शेतीसाठी लागणाऱ्या प्राथमिक गरजा व सोयीसुविधांची पूर्तता होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राबविण्यात येत आहे. या योजमेमध्ये मागेल त्याला शेततळे या योजनेचा विस्तार करण्यात आला असून काही लाभ वाढविण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेंतर्गत मिळणारे लाभ
1) मागेल त्याला फळबाग
2) मागेल त्याला ठिबक आणि तुषार सिंचन
3) मागेल त्याला शेततळे
4) शेततळ्याचे अस्तरीकरण
5)हरितगृह / शेडनेट
6) पेरणी यंत्रे
7) कॉटन श्रेडर
8) बीबीएफ यंत्र
Inspirational Story | शेतातील तण विकून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये! या पठ्ठ्याची कमाल एकदा वाचाच…
महत्त्वाची बाब म्हणजे मागेल त्याला शेततळे योजनेचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असे ठेवण्यात आले असले तरी, या योजनेच्या अंमलबजावणीच्या सुचनांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे मागेल त्याला शेततळे योजनेच्या सर्व अटी, अनुदानाची रक्कम, आवश्यक कागदपत्रे यांसारख्या बाबी छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेला लागू होतात.
Onion Rate । महाराष्ट्रात कांद्याचा घाऊक भाव 4500 रुपये प्रति क्विंटल, जाणून घ्या राज्यातील बाजारभाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या योजनेचे नाव बदलण्यात आलेले आहे. योजनेबाबत अधिक माहिती कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.