Success Story

Success Story | डाळिंबाची शेती करून तरूण शेतकऱ्याने कमावले कोट्यवधी रुपये!

यशोगाथा

Success Story | शेती व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. पारंपरिक पिके सोडून शेतकरीवर्ग आता आधुनिक पिकांचे उत्पादन घेत आहेत. एवढेच नाही तर परदेशी पिकांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान ( Modern Technology) वापरत आहेत. यातून त्यांना मोठा आर्थिक फायदा देखील होतोय. बाभूळगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने डाळिंबाची शेती करून कोट्यवधी रुपयांचे उत्पादन घेतले आहे.

Inspirational Story | शेतातील तण विकून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये! या पठ्ठ्याची कमाल एकदा वाचाच…

आजकालचे तरुण शेती व्यवसायाकडे पाठ फिरवत आहेत. अशी ओरड असताना बाभूळगाव येथील दीपक गुरगुडे या तरुणाने पाच एकर डाळिंबाच्या शेतीतून 71 टन 200 किलो उत्पादन घेत तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. यंदाच्या वर्षी तर त्यांची डाळिंबे चक्क बांगलादेशासह दुबईला पोहोचली आहेत.

Onion Rate । महाराष्ट्रात कांद्याचा घाऊक भाव 4500 रुपये प्रति क्विंटल, जाणून घ्या राज्यातील बाजारभाव

मागील पाच ते सात वर्षांपासून दीपक गुरगुडे आपल्या शेतात डाळिंबाचे (Pomegranate) उत्पादन घेत आहेत. त्यांनी इस्रायली पद्धतीने डाळिंबाची शेती केली आहे. गुरगुडे यांच्या पाच एकर क्षेत्रात सुमारे ३ हजार ४०० झाडे असून त्यांच्या औषध फवारणीसाठी जपानी पद्धतीच्या स्प्रेइंग मशीनचा वापर करण्यात येतो.

Spiny Gourd Farming | शेतकरी मित्रांनो मालामाल करणाऱ्या ‘या’ पिकाची लागवड एकदा कराच! मिळेल लाखोंचे उत्पन्न

“तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने करावी. तिच्याकडे व्यवसाय म्हणून लक्ष केंद्रित करावे. शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्राची प्रत तपासणे अत्यंत आवश्यक आहे.” असे मत दीपक गुरगुडे यांनी व्यक्त केले आहे. डाळिंब हे उष्ण कटिबंधातील कमी पाण्यावर येणारे पीक आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकरी सुद्धा हे पीक घेऊ शकतात. असा सल्ला देखील ते देतात.

Government Schemes | शेती करायचीय पण जमीन नाही? चिंता करू नका! राज्य सरकारची ‘ही’ योजना देत आहे लाखोंचे अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *