Success story

Success story । गांडूळ खताचा यशस्वी प्रयोग! परदेशात निर्यात करून वर्षाला शेतकरी मिळवतोय 15 लाख रुपयांचं उत्पन्न

यशोगाथा

Success story । भारत हा कृषिप्रधान देश आहे. अनेक पिकांचे येथे उत्पन्न घेतले जाते. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. शेतकरी आता आधुनिक शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. यासाठी योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे. परंतु अनेकांचा शेतीवरच उदरनिर्वाह होत नसल्याने ते शेतीसोबत कुक्कुटपालन आणि पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) सुरु करतात.

Government Schemes । जगातील सगळ्यात मोठी DBT योजना! सोप्या पद्धतीने घ्या योजनेचा लाभ

अनेकजण आता पशुपालनातुन लाखो रुपयांची कमाई करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायातून फक्त दूधविक्रीतून नाही तर शेणखतातून देखील पैसे कमावता येतात. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पारनेरमधील एका शेतकऱ्यानं गांडूळ खताचा व्यवसाय केला असून या खताच्या विक्रीतून शेतकरी वर्षाला लाखोंची कमाई करत आहेत.

Success story । वडिलांसाठी तिनं सोडला आयटीचा 15 लाखांचा जॉब, आज शेतीतून करतेय कोट्यावधी रुपयांची उलाढाल

कमाई

अमरनाथ अंदुरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे एकूण 50 एकर जमीन आहे. त्यापैकी ते फक्त पाच एकर जमिनीवर शेती करतात. त्यांनी आपल्या शेतात गांडूळ खताचा (Vermicompost) प्रयोग केला असून या गांडूळ खताच्या विक्रीतून प्रत्येक वर्षाला 15 लाख रुपयांची कमाई करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी तयार केलेले खत (Vermicompost business) परदेशात निर्यात केले जात आहे.

Sugar Factory । 1 नोव्हेंबरला पेटणार का कारखान्याचं धुराडं? मंगळवारी बैठकीत होणार निर्णय

तसेच त्यांनी 100 आंब्याची झाडे लावली असून ते चांगले उत्पन्न मिळवत आहे. इतकेच नाही तर अमरनाथ अंदुरे यांनी 5,000 रुपये खर्च करून उसाचा पेंढा आणि लाकूड वापरुन 40 x 25 आकाराचा गोठा बांधला असून ते या गोठ्यातून गांडूळ खत निर्मिती करतात. त्यांना अंदाजे 50 हजार रुपये खर्च येतो.

Havaman Andaj । नागरिकांना सोसावा लागणार उन्हाचा चटका! मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *