Havaman Andaj । सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. काही राज्यांमध्ये लोकांना दिवसा उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. परंतु यावर्षी देशासह राज्याला पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. राज्याच्या अनेक भागात अपेक्षित पाऊस पडला नाही. धरणाच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
Black pepper । करा ‘या’ गुणकारी काळ्या मिरीची शेती, एका झाडापासून मिळेल हजारोंचे उत्पन्न
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी राज्यातून निरोप घेतल्यानंतर देशाच्या बहुतांश भागातूनही मॉन्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तसेच हवामान खात्याने ईशान्य भारत आणि दक्षिणेकडील काही भाग वगळता उर्वरित देशातून मॉन्सून परतला आहे, असे म्हटले आहे. लवकरच मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी जाऊ शकतो. नागरिकांना आता उन्हाचे चटके सहन करावे लागतील.
दरम्यान, संपूर्ण राज्यातून सोमवारी (ता. ९) मॉन्सूनने जवळपास माघार घेतली असून शुक्रवारी (ता. १३) मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरु केला आहे. तसेच झारखंड, ओडिशा, तेलंगणाचा बहुतांश भाग, छत्तीसगडसह पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, उत्तर अंतर्गत कर्नाटक, मॉन्सूनची परतीची सीमा मालदा, विशाखापट्टण, नालगोंडा आणि रायचूर ते वेंगुर्लापर्यंत पोहोचली आहे.
Agriculture news । सफरचंद उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत