Black pepper । भारतात वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेतले जाते. शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. शेतकरी आता आधुनिक शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. यासाठी योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे. पारंपरिक पिकाला फाटा देत आता अनेकजण आधुनिक शेती करू लागले आहेत.
अनेकजण आता काळी मिरीची शेती करून शेतकरी लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. विविध प्रकारच्या औषधांमध्ये प्रामुख्याने काळी मिरीचा वापर करतात. त्यामुळे काळ्या मिरीला खूप मागणी असते. (Black pepper Cultivation Information) भारतात मोठ्या प्रमाणावर या पिकाचे उत्पन्न घेतले जाते. महत्त्वाचे म्हणजे परदेशात काळी मिरीची निर्यात करतात. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ, तामिळनाडू या राज्यात काळ्या मिरीची लागवड (Black pepper Cultivation) करतात.
Agriculture news । सफरचंद उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
कमाई
कमाईचा विचार केला तर काळ्या मिरीच्या एका झाडापासून शेतकरी 15 ते 20 हजार रुपयांचा नफा मिळवतात. एक एकर क्षेत्रात पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. जर तुम्ही या पिकाची शेती केली तर तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होईल. संपूर्ण वर्षभर काळया मिरीला मागणी असते.
Government Schemes । सरकार देतंय वराहपालनासाठी अनुदान, आजच करा ‘या’ सोप्या पद्धतीने अर्ज
अशी करा लागवड
काळ्या मिरीसाठी 10 ते 50 डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते. याच्या लागवडीसाठी लाल माती आणि लाल लॅटराइट माती उत्तम असते. तसेच जास्तीत जास्त पाणी दाखविणारी माती गरजेची आहे. मातीचे पीएच मूल्य 4.6 ते 5 असते. तुम्ही बियाणे आणि कटिंग अशा दोन्ही पद्धतीने लागवड करू शकता. हे लक्षात ठेवा की पेन लावताना त्यांच्यामध्ये योग्य अंतर ठेवा. तुम्ही एक हेक्टर जमिनीवर दीड हजारापेक्षा जास्त झाडे लावू शकता.
Success story । शेतकऱ्याची लै भारी कमाल! २५ टन पेरूतून घेतले तीस लाखांचे उत्पन्न
खते
जर तुम्हाला चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर खते आणि सिंचन चांगल्या पिकासाठी निंबोळीचे मिश्रण कंपोस्ट किंवा शेणखत घालून जमिनीत चांगले मिसळून घ्या. त्यानंतर पेन लावा किंवा बी टाका. आम्लयुक्त जमिनीत, प्रत्येक रोपाला प्रत्येक वर्षी 500 ग्रॅम चुना किंवा डोलोमाइट देणे गरजेचे आहे. 100 ग्रॅम पोटॅशियम, 750 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेटही जमिनीत मिसळणे गरजेचे आहे.
Havaman Andaj । येत्या दोन दिवसात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार परतीचा पाऊस, जाणून घ्या IMD अलर्ट
सुधारित प्रजाती
काळी मिरीच्या अनेक सुधारित जाती आहेत. भारतात काळी मिरीच्या 75 पेक्षा जास्त प्रजातींची लागवड करतात. यात मध्य केरळचे नारायणकोडी, दक्षिण केरळचे कोट्टनादन आणि केरळचे करीमुंडा हे चांगले वाण आहे. तसेच नीलमुंडी, बालनकोट्टा आणि कुथिरवल्ली या जाती आहेत.
Agriculture News । नुकसानग्रस्तांना मिळाला दिलासा! सरकारकडून मिळाले तब्बल 154 कोटी