Agri Business । भारतात जरी मोठ्या प्रमाणात शेती केली जात असली तरी अनेकांचा उदरनिर्वाह शेतीवरच होत नाही. कारण प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. त्यात शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतेच असे नाही. त्यामुळे अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. जर तुम्ही देखील पशुपालन (Animal husbandry) करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आता तुम्ही पशुपालनासोबत आणखी एक व्यवसाय सुरु करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला यातून लाखो रुपयांची कमाई देखील करता येईल. तुम्ही आता शेणापासून फरशा बनवू शकता. तुम्ही अनेकांच्या घरात चकाकणाऱ्या फरशा पाहिल्या असतील. परंतु तुम्ही शेणाच्या फरशा अशी कधी कल्पना केली आहे का? बाजारात देखील या फरशांना (Cow dung business) चांगली मागणी आहे.
अशी तयार होते फरशी
शेणावर प्रक्रिया करून यंत्राच्या मदतीने शेणाच्या फरशा तयार करण्यात येतात. तसेच हाताने देखील फरशा तयार केल्या जातात. या फरशा सेंद्रिय असल्याने त्यांना बाजारात देखील चांगली मागणी असते. या फरशांमुळे घरातील वातावरण थंड राहते. उन्हाळ्याच्या दिवसात याचा चांगला फायदा होतो. तुम्ही ती ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने खरेदी करू शकता.
Success Story । डाळिंबाच्या शेतीतून युवा शेतकऱ्यानं बक्कळ कमवलं! कमी खर्चात मिळवला लाखोंचा नफा
लागणारा खर्च
या व्यवसायासाठी तुम्हाला टाइल बनवण्याचे यंत्र लागेल. किंमत 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपयांपर्यंत असू शकते. बाजाराच्या मागणीनुसार तुमचा व्यवसाय वाढवू करू शकता.
लागणारे साहित्य
- चुना पावडर
- कोरडे शेण
- चंदन पावडर
- नीलगिरीचे पान
- भूसा
- कमळाचे पान
बनवण्याची पद्धत
- शेणाच्या फरशा बनवण्यासाठी सर्वात अगोदर शेण 2-3 दिवस उन्हात वाळवा.
- मशीनच्या मदतीने वाळलेल्या शेणाची पावडर तयार करा.
- भुसा तयार झाल्यानंतर त्यात कमळाची पाने, नीलगिरीची पाने, चुना आणि चंदन पावडर मिसळा.
- त्यांची पेस्ट तयार करा.
- ही पेस्ट विविध टाइल्स किंवा वीट बनवण्याच्या साच्यात घाला.