PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी त्यांच्यावर अनेकदा आर्थिक संकट देखील उभे राहते. साहजिकच डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढल्याने काही शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असते. ज्याचा शेतकरीदेखील फायदा घेत आहेत.
जर तुम्ही देखील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (Prime Minister’s Farmers Samman Nidhi Yojana) लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी 15 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लवकरच या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. परंतु त्यापूर्वी काही शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. (Government Schemes)
मिळणार नाही पैसे
काही शेतकऱ्यांना या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केली नाही, त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना आता यादीतून बाहेर करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हीदेखील पीएम किसान योजनेसाठी पात्र असल्यास तर हप्ता मिळण्यात तुम्हाला पण अडचण येईल.
Land Ownership । जमिनीच्या मालकी हक्कात कोणत्या गोष्टींमुळे बदल होतात? वाचा सविस्तर
असे करा ई-केवायसी
आता तुम्हाला केवायसी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येईल. तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अपडेट करू शकता आणि CSC केंद्रावर जाऊन देखील ही माहिती अपडेट करू शकता. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर योजनेचा हप्ता जमा होणार नाही.
Milk Production । देशातील ‘या’ राज्यात होते सर्वाधिक दूध उत्पादन, पहा यादी