Success Story

Success Story । डाळिंबाच्या शेतीतून युवा शेतकऱ्यानं बक्कळ कमवलं! कमी खर्चात मिळवला लाखोंचा नफा

यशोगाथा

Success Story । पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी विविध प्रयोगातून यशस्वी प्रयोग करत असल्याचे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. आधुनिक शेतीत जास्त मेहनत करणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला या शेतीत बक्कळ नफा होईल. अलीकडच्या काळात युवा वर्गदेखील लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. काहीजण रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करत आहेत.

PM Kisan Yojana । दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा धक्का! खात्यावर येणार नाही 2 हजार रुपये, नेमकं कारण काय?

अनेकजण उसाची शेती करतात. परंतु सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड येथील एका शेतकऱ्याने डाळिंबाची (Pomegranate) शेती केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उसाची शेती करतात. जिकडे नजर जाईल तिकडे उसाचे पीक पाहायला मिळते. परंतु शंकर भगवान लटके या शेतकऱ्याने ही परंपरा मोडत दोन एकर डाळिंबाची लागवड (Pomegranate Cultivation) केली आहे.

Havaman Andaj । बिग ब्रेकिंग! पुढील ४ दिवस अवकाळीचं सावट, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना दिला जोरदार पावसाचा इशारा

मिळाला 110 रुपयांचा दर

या दोन एकरात त्यांना लाखो रुपयांचा नफा देखील मिळाला आहे. शंकर पाटील यांच्याकडेदेखील पूर्वी उसाची शेती होती. परंतु त्यांनी डाळिंबाची लागवड केली आहे. डाळिंबाला प्रति किलोला 110 रुपयांचा दर मिळाला असून आत्तापर्यंत 10 टन डाळिंबाची विक्री केली आहे. उर्वरित पिकातून त्यांना 15 टन माल मिळेल अशी अपेक्षा आहे. 100 रुपये किलोप्रमाणे त्यांना 25 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

Encroachment On Land । काय आहे खासगी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया? जाणून घ्या सविस्तर

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेच काम अशक्य नसते, असे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत अनोखा प्रयोग या शेतकऱ्याने केला आहे. खरंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उजनी धरणाचा खूप फायदा होतो. परंतु जर पाऊस कमी पडला तर त्याचा फटका देखील या शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे आता पाणी साठा कमी असल्याने शेतकरी इतर पिके घेऊ लागली आहेत.

Land Ownership । जमिनीच्या मालकी हक्कात कोणत्या गोष्टींमुळे बदल होतात? वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *