Sugarcane । भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी उसाची लागवड (Cultivation of sugarcane) केली जाते. उसाच्या विविध जाती आहेत, ज्यामुळे उसाचे उत्पन्न निघते. काही शेतकरी काही गुंठ्यांमध्ये भरघोस उत्पादन मिळवतात. शेतकरी अनेक समस्यांवर मात करत जास्त उत्पन्न मिळवतात. अशाच एका शेतकरी महिलेने एकरी १५० टन उत्पादन घेतले आहे. (Sugarcane Cultivation)
Government Schemes । सरकारी अनुदानासह खरेदी करा जमीन, ‘या’ लोकांना मिळतोय लाभ
कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान
विमल चौगुले (Vimal Chaugule) असे या शेतकरी महिलेचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या मजरेवाडी गावात राहतात. त्या राज्यातील सर्वांत जास्त उसाचे उत्पन्न घेणाऱ्या महिला ठरल्या आहेत. भरघोस उत्पादन मिळवल्याबद्दल त्यांना कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी एकरी १५० टन उसाचे उत्पन्न घेत राज्यात पहिला क्रमांक मिळवला.
Foreign tour of farmers । मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला दीड कोटींचा निधी
असे केले नियोजन
सप्टेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात विमल चौगुले यांनी उसाची लागवड केली होती. लागवड करण्यापूर्वी शेतीची पूर्ण मशागत करत त्यांनी जमीन कसदार बनवली होती, यानंतरत्यांनी शेतीत योग्य व्यवस्थापन आणि जास्तीत जास्त सेंद्रीय खतांचा वापर केला. अनेक शेतकरी भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खताचा वापर करतात. पण चौगुले यांनी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर करणे त्यांनी टाळले आहे.
सध्या रासायनिक खतांचा भरमसाठ वापर होत असून जमिनीचा पोत खालावत चालला आहे. विमल चौगुले यांनी सेंद्रिय खते आणि योग्य व्यवस्थापनातून शेतीमधून चांगले उत्पन्न काढू शकतो हे दाखवून दिलं आहे. इतकेच नाही तर त्या पिकांना पोषक अन्नद्रव्ये मिळण्यासाठी ते दरवर्षी पिकांची फेरपालट करतात. ज्याचा त्यांना खूप फायदा होत आहे.
Milk business । महाराष्ट्रातील ‘हे’ अख्ख गाव करतंय दूध व्यवसाय, होतेय लाखोंची कमाई
शिवाय केळी आणि मिरचीची बेवड उस पिकासाठी फायद्याची ठरते, असे विमल चौगुले यांनी सांगितलं आहे. तसेच चौगुले यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. जनावरे असल्याने त्यांना शेणखत उपलब्ध होते. शेतातील पालापाचोळा आणि उसाचे पाचटही शेतातच कुजवले जात असून मातीतील सेंद्रीय कर्ब वाढण्यास मदत होते.