Germany Farmer Protest । शेतकरी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सतत रस्त्यावर येत असतात. अशातच आता सरकारविरोधात शेतकऱ्यांनी (Farmer Protest) आक्रमक भूमिका घेतली आहे. बर्लिनमध्ये शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. सरकारविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून शेतकरी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत होते.
Wheat crops । गव्हाच्या पिकामध्ये गुळासोबत करा ‘हा’ अनोखा प्रयोग, उत्पन्नात होईल वाढ
जर्मनीच्या सर्व 16 राज्यांत कडाक्याच्या थंडीत शेतकरी ट्रॅक्टरच्या ताफ्यासह रस्त्यावर उतरले असून आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांशी झटापट केली. सरकारने जर आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीतर आणखी कठोर भूमिका घेणार असल्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे. (Farmer Protest in Germany)
Farming on AI । काय सांगता! बारामतीत केली जातेय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर शेती
नेमकं प्रकरण काय?
जर्मन सरकारकडून मागील वर्षी डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात कपात करण्यात आली होती. शेतीमध्ये वापरल्या जाणार्या डिझेलवरील कर परतावा (Refund of tax on diesel) आणि ट्रॅक्टरवरील कर सूट (Tax on tractors) रद्द केली. त्यासाठी सरकारी पैशांची बचत झाल्याचे सांगण्यात आले होते.
Sugarcane workers । ऊसतोड कामगारांबाबत सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय
शेतकऱ्यांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या अनुदानातून सरकारला प्रत्यक्षात 90 कोटी युरो वाचवायचे असून अनुदानातील कपात लवकरात लवकर पूर्ववत करावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मागील वर्षी १८ डिसेंबरपासून आंदोलन सुरू केले होते.
शेतकऱ्यांचा विरोध हायजॅक होण्याची शक्यता
यंदा जर्मनीत होणाऱ्या निवडणुकीत विजयाची शक्यता शोधत असणाऱ्या AfD या अतिउजव्या पक्षाने शेतकऱ्यांच्या या निदर्शनाला पाठिंबा दिला आहे. सध्याच्या सरकारबद्दल जर्मन लोकांच्या असंतोषाचा पुरावा म्हणून पक्ष या प्रदर्शनाचा वापर करत आहे. याबाबत जर्मन इन्स्टिट्यूट फॉर न्यू सोशल ऑनर्सचे हर्मन ब्लिंकर्ट असे म्हणतात की सरकार अडचणीत सापडले आहे. या निदर्शनाचा फायदा उजव्या विचारसरणीचे अतिरेकी घेण्याची शक्यता आहे,असा इशारा जर्मनीच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाने दिला आहे. ही निदर्शने हायजॅक करण्याचा कट या अतिरेक्यांचा आहे.