VR glasses

VR glasses | रशियात गायींना लावला जातो व्हीआर चष्मा, दूध उत्पादनात होते मोठी वाढ; वाचा सविस्तर माहिती

पशुसंवर्धन

VR glasses । भारतात मोठ्या प्रमाणावर शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) केला जातो. या व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे दुधाळ जनावरांची किंमत (Price of animals) बाजारात सर्वात जास्त असते. खरेदीदार ही जनावरे चांगल्या भावाने विकत घेतात. जर या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते.

Abroad visit । आता शेतकऱ्यांनाही करता येणार परदेश दौरा, काय आहे सरकारची योजना? जाणून घ्या

मिळते जास्त उत्पन्न

बाजारात अशी काही जनावरे आहेत जी जास्त दूध देतात. पशुपालनातून (Animal husbandry) जास्त कमाई करण्यासाठी पशुपालक दिवसरात्र मेहनत करतात. पण तुम्ही आता एका युक्तीने जास्त उत्पन्न मिळवू शकता. होय, सध्या सगळीकडे व्हीआर चष्म्याची चर्चा आहे. हा चष्मा जनावरांना घातला तर जनावरे जास्त दूध देतात.

Crop Damage Compensation । ब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यात ६५ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटींची मदत मंजूर

व्हीआर चष्मा घातलेल्या गायींचा व्हिडिओ माइंडसेट एच2 नावाच्या युजरने अपलोड केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 13 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर 5 हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. आता प्रश्न पडतो की प्रत्यक्षात गायीला व्हीआर चष्मा लावला तर ती जास्त दूध देते का? जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही ही युक्ती तुमच्या आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या दूध बांधवांना सांगू शकता. त्यावरून तुम्हाला त्यांच्या दूध उत्पादनात काही वाढ झाली आहे की नाही हे समजेल. (Milk production)

Urea Fertilizer । शेतकऱ्यांनो सावधान! ‘या’ पिकासाठी चुकूनही वापरू नका युरिया, नाहीतर आर्थिक नुकसान झालेच समजा

काय आहे व्हीआर चष्मा?

MindSet H2 नावाच्या युजरने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये गायींना 24 तास व्हीआर चष्मा घालण्यासाठी तयार केला आहे, असे सांगितले आहे. यात हिरवे गवत आणि मोकळे मैदान यांचा व्हिडिओ प्ले केला असल्याने गाई मोकळ्या मैदानात राहत असल्याचा भ्रम होतो. असे केल्याने गायींचा मूड सुधारतो. या संपूर्ण प्रक्रियेतून गाईची दूध देण्याची क्षमता वाढते. इतकेच नाही तर गाईंच्या आरोग्यावरही त्याचा चांगला परिणाम होतो.

Onion । ‘या’ तंत्रज्ञानामुळे साठवणूक केलेला कांदा कधीच सडणार नाही, कसे ते जाणून घ्या

रशियामध्ये खूप थंडी असून गायी जास्त उष्णता किंवा जास्त थंडी सहन करू शकत नाहीत. यामुळे, रशियातील गायींना व्हीआर चष्मा घालण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, जेणेकरून त्यांना वाटेल की ते गवत आणि मोकळ्या मैदानात असून येथील हवामान आनंददायी आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे गायी सुरक्षित राहत असून त्यांची दूध देण्याची क्षमताही वाढते.

TOP 5 Tractor Under 3 Lakh । हे आहेत भारतातील सर्वात स्वस्त ट्रॅक्टर, मिळेल शक्तिशाली इंजिन आणि फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *