Government Schemes । सरकारने ग्रामीण भागातील सुशिक्षित आणि बेरोजगार युवकांसह पशुपालक तसेच शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. ज्याचा तुम्हीदेखील लाभ घेऊन चांगली कमाई करू शकता. अनेकांना सरकारच्या या खास योजनेबद्दल (Schemes) माहिती नाही त्यामुळे या योजनेचा त्यांना लाभ घेता येत नाही.
Agriculture Technology । युवा शेतकऱ्याचं अनोखं जुगाड! स्वतःच बनवला इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेयर
सध्या पशुसंवर्धन विभागाकडून ग्रामीण भागातील पशुपालकांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुपालकांना केले जात आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आजच सोप्या प्रकारे योजनेत सहभागी व्हा.
Black Wheat Sowing । रब्बी हंगामात करायची असेल बक्कळ कमाई तर काळ्या गव्हाची लागवड, मिळतोय ‘एवढा’ दर
असा घ्या लाभ
- लाभ घेण्यासाठी तुम्ही पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर किंवा टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ वर संपर्क साधू शकता.
- या योजनांमुळे ग्रामीण भागातील पशुपालकांना दूध, मांस आणि अंडी यासारख्या पौष्टिक उत्पादनांचा पुरवठा वाढून ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुधारू शकते.
- यामुळे ग्रामीण भागातील जनावरांच्या आरोग्याचे रक्षण होईल.
- तसेच जनावरांची उत्पादकता वाढण्यास देखील खूप मदत होईल.
Ration Card । सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत मिळणार साडी, असा घ्या लाभ
आवश्यक कागदपत्रे
- मतदार ओळखपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशनकार्ड
- शैक्षणिक पात्रता – किमान १२ वी उत्तीर्ण
- उत्पन्नाची पात्रता -२ लाख रुपयांपेक्षा कमी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक जमीन (किमान १०० चौरस मीटर)
- लाभार्थ्याने पशुसंवर्धन विभागाच्या योजनांमध्ये लाभ घेतला नसावा.
Unseasonal Rain। कोकणसह मध्य महाराष्ट्रात का पडतोय अवकाळी पाऊस? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण
फायदे
शेळी-मेंढी गट वाटप, दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप, १,००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य, २५+३ तलंगा गट वाटप आणि १०० कुक्कुट पिलांचे वाटप या योजनांचा समावेश आहे. तुम्ही ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकता.
Success Story । उच्चशिक्षित दाम्पत्याची कमाल! अवघ्या 5 महिन्यात केशरमधून मिळवले 8 लाख रुपये