Black Wheat Sowing । शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या लागवडीची लगबग सुरु आहे. या हंगामात हरभरा आणि गहू या दोन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण पिकांना थंड हवामान लागते. खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांना चांगली कमाई करता आली नाही. परंतु आता तुम्ही या हंगामात चांगली कमाई करू शकता.
Ration Card । सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत मिळणार साडी, असा घ्या लाभ
त्यासाठी तुम्हाला काळ्या गव्हाची (Black Wheat) लागवड करावी लागणार आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर या गव्हाची लागवड (Cultivation of Black Wheat) करतात. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांत काळ्या गव्हाची लागवड (Black Wheat Cultivation Information) केली जाते. बाजारात या वाणाची 7000 ते 8000 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केली जात आहे. रब्बी हंगामात काळ्या गव्हाची लागवड केली जाते.
Unseasonal Rain। कोकणसह मध्य महाराष्ट्रात का पडतोय अवकाळी पाऊस? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण
साधा आणि काळ्या गव्हातील फरक
काळ्या गव्हात अॅन्थोसायनीन पिंगमेंटचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे या गव्हाला काळा रंग येतो. तर साध्या गव्हात अॅन्थोसायनीन पिंगमेंटचं प्रमाण 5 ते 15 पीपीएम असते. हेच प्रमाण काळ्या गव्हात 40 ते 140 पीपीएम इतके असतं. काळ्या गव्हात अॅन्थोसायनीन आढळते. जे हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, मानसिक विकार आणि अॅनिमिया या आजारांवर हे फायदेशीर असते.
Success Story । उच्चशिक्षित दाम्पत्याची कमाल! अवघ्या 5 महिन्यात केशरमधून मिळवले 8 लाख रुपये
या कालावधीत करा लागवड
या गव्हाची जरी रब्बी हंगामात लागवड केली जात असली तरी त्याची पेरणी 30 नोव्हेंबरपर्यंत करणे गरजेचे आहे, असे कृषी शास्त्रज्ञांचे मत आहे. समजा तुम्ही सरीवर गव्हाची लागवड करत असल्यास प्रति एकर 40 ते 50 किलो बियाणे गरजेचे आहे. पेरणीनंतर चांगल्या पिकासाठी चार ते पाच पाणी द्या. महत्त्वाचे म्हणजे कळ्या फुटण्याच्या वेळी दाणे पिकण्याच्या वेळी पाणी द्यावे लागते.
कमी खर्चात जास्त उत्पन्न
त्याशिवाय काळ्या गव्हाच्या पेरणीचा खर्च हा सामान्य गव्हापेक्षा खूप कमी असतो. तुम्हाला एकरी 7 ते 8 हजार रुपये खर्च येईल. महत्त्वाचे म्हणजे त्यावर तुम्हाला कोणत्याही रासायनिक औषधाची फवारणी करावी लागणार नाही. तुमचा औषधांचा खर्च वाचू शकतो. या गव्हाच्या एका बुंद्याला 9 ते 10 उंब्या येतात.
PM Kisan Yojana । सरकारकडून दिवाळीआधी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होतील ‘इतके’ पैसे
किती मिळतो दर?
खरंतर बाजारात काळ्या गव्हाची किंमतही सामान्य गव्हापेक्षा जास्त असते. या गव्हाला बाजारात 8000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळतो. एक क्विंटल काळ्या गव्हाची किंमत सामान्य गव्हाच्या डबल आहे. त्यामुळे जर तुम्ही या गव्हाची लागवड केली तर तुम्हाला जास्त नफा मिळेल.
Havaman Andaj । ऐन थंडीत अवकाळी पावसाचा कहर! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस