Milk Rate । अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. जर तुम्हाला या व्यवसायांत जास्त नफा मिळवायचा असल्यास तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. मागील काही दिवसांपासून दुधाचे दर कोसळले (Milk Rate Falls Down) आहेत. त्यामुळे पशुपालकांसह शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत.
PM Kisan Yojana । सरकारकडून दिवाळीआधी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होतील ‘इतके’ पैसे
पशुपालकांवर मोठे संकट
दूध खरेदीदाराकडून सध्या दूध खरेदी करत असताना चांगला दर देण्यात येत नाही. गाईच्या दूधाला ४० रूपये (Cow Milk Price) आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ८० रूपये दर मिळावा, अशी मागणी आता केली जात आहे. खासगी दूध संघांकडून दूध दरात कपात करण्यात आली आहे. कमी पावसामुळे चारा जास्त दराने खरेदी करावा लागत आहे. कमी दूध दरांवरून (Milk Price) दूध उत्पादक वर्ग कमालीचा नाराज झाला आहे.
Havaman Andaj । ऐन थंडीत अवकाळी पावसाचा कहर! ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस
….तर करणार खर्डा भाकरी आंदोलन
अशातच आता दूध दरांवरून रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. दूध उत्पादकांनी सोलापूरात पंढरपूर ते विजापूर रोडवर एकलासपूर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. राज्य सरकारच्या धोरणाचा निषेधार्थ त्यांनी दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक देखील घातला. तसेच दरवाढ करा नाहीतर दिवाळी पाडव्याच्या दिवशी विखे पाटील यांच्या घरासमोर खर्डा भाकरी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला आहे.
दरम्यान, दुधाचे दर कमी झाल्याने जून महिन्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व दूध सहकारी आणि खासगी संस्थांची एक महत्त्वाची बैठक देखील घेतली होती. या बैठकीत दूध खरेदी दर राज्यात एकसमान असावा आणि तो ३५ रुपये लिटर दिला जावा, अशी चर्चा झाली होती. परंतु त्यानंतर पुन्हा दर कोसळले आहेत. त्यामुळे पशुपालकांवर मोठे संकट आले आहे.
Post Monsoon Rain । अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, हजारो हेक्टर पिकांचे नुकसान