Milk Price । दूध उत्पादनाच्या बाबत बोलायचे झाले तर भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. जर तुम्हाला या व्यवसायांत जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करणे गरजेचे असते. अशातच आता दूध उत्पादकांना काळजीत टाकणारी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Milk Production । पशुपालकांनो, स्वच्छ दूध उत्पादनासाठी घ्या ‘ही’ काळजी
देशात महागाईने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. अशातच आता दूध उत्पादकांना खूप मोठा फटका बसला आहे. दूध उत्पादकांची दिवाळी कडू होण्याची शक्यता आहे. कारण मागील तीन महिन्यापूर्वी दुधाचे दर ३ रुपयांनी (Milk Rate) घसरले होते. अशातच आता हे दर आणखी घसरण्याची (Milk Rate Falls Down) शक्यता आहे. गाय दूध दराने मे, जून महिन्यामध्ये ३८ रुपयांचा उच्चांक नोंदवला.
Havaman Andaj । सावधान! राज्यासह देशातील या भागात पडणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला इशारा
चाऱ्याच्या दरात वाढ
तसेच जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पाच रुपयांनी दर कमी झाले आहेत. अगोदरच प्रचंड वाढलेले पशुखाद्याचे दर, चाऱ्याच्या दरामुळे दूध उत्पादक अडचणीत आले आहे. सरकारचे नियंत्रण नसल्याने दूध संघ मनमानी करत आहेत. परंतु, दूध दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. दूध व्यवसायात त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
दूध व्यवसाय तोट्यात
जर हा दर असाच कायम राहिले तर दूध उत्पादक पुन्हा सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतात. दर कायम राहावा यासाठी उपाययोजना केल्या तरी दुधाची घसरण थांबत नाही. अशातच आता दूध व्यवसाय तोट्यात जात आहे, त्यामुळे दूध उत्पादक त्रस्त झाले आहेत. येत्या काळात दर आणखी घसरणार की वाढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Vegetable farming । भरघोस नफा मिळवायचा आहे? तर मग करा ‘या’ हिरव्या भाज्यांची लागवड