Government Schemes । देशात मोठ्या प्रमाणात शेती हा प्राथमिक व्यवसाय केला जातो. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, त्यांना आर्थिक पाठबळ उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत अनेक योजना राबवत असते. सरकारची अशीच एक योजना आहे, ज्यात हरितगृह, ट्रॅक्टर (Tractor Subsidy) आणि कांदाचाळीसाठी अनुदान (Subsidy) मिळत आहे. काय आहे सरकारची योजना? जाणून घ्या.
Vegetable farming । भरघोस नफा मिळवायचा आहे? तर मग करा ‘या’ हिरव्या भाज्यांची लागवड
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे या हेतूने सरकार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. आता तुम्ही देखील या योजनांमध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत. अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईटला भेट द्या.
Land Rule । काय सांगता! शेतीचा बांध कोरला तर कारवाई होते? महत्त्वाचा नियम एकदा वाचाच
आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी होल्डिंग (आठ-अ), बँक पासबुक, सातबारा, आधार कार्ड लिंक असणारा मोबाइल सोबत असावा.
Success Story । ऊसतोड कामगार बनला दोन कोटींचा बागायतदार, जाणून घ्या या शेतकऱ्याची थक्क करणारी कहाणी
कोणत्या योजनांचा घेता येईल लाभ?
सामूहिक शेततळे, मशरूम उत्पादन, पॅक हाउस, हरितगृह, शेडनेट हाउस, प्लॅस्टिक मल्चिंग, फूलपीक लागवड, ट्रॅक्टर २० एचपी, शेतकरी अभ्यास दौरा, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदा चाळ, प्राथमिक प्रक्रिया केंद्र या योजनांचा लाभ घेता येईल.
किती मिळेल निधी?
हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ११ लाख रुपये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ११.९२ लाख रुपयांचा निधी मिळेल.
Success Story । राजकारण सोडून 65 वर्षीय शेतकरी शेतीतून कमावतोय 40 लाख, कसे केले नियोजन? जाणून घ्या…