Dhananjay Munde

Dhananjay Munde । आनंदाची बातमी! ‘या’ पिकाच्या लागवडीसाठी मिळणार हेक्टरी 7 लाखांचं अनुदान

शासकीय योजना

Dhananjay Munde । शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आणत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. राज्य सरकार आता शेतकऱ्यांना हेक्टरी 7 लाखांचं अनुदान देणार आहे. याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषणा केली आहे.

Modern agriculture । इस्रायल शेती तंत्र जगभरात का लोकप्रिय आहे? कशी करतात येथे शेती? जाणून घ्या…

“शेतकऱ्यांना आता बांबू लागवडीसाठी (Bamboo cultivation) अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना एक हेक्टर आत बांबू लागवड करण्यासाठी एकूण सात लाख रुपयांचे अनुदान (Bamboo cultivation subsidy) दिले जाणार आहे. बांबूचे पिक मातीचे आरोग्य वाढविणारे असून दिवसेंदिवस रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहि. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे,” असे मुंडे बोलताना म्हणाले आहेत.

Sweet Potato Varieties । ‘या’ आहेत रताळ्याच्या सुधारित जाती, लागवड केल्यास मिळेल प्रचंड नफा

दरम्यान, आता लातूर आणि सातारा या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर केली जाणारी बांबू लागवड बीडमध्ये केली जाईल. तीन बाय सहाचा खड्डा आणि त्यात लागणारे बांबूच्या रोपासाठी पन्नास रुपये अनुदान मिळेल. फळबागसाठी मनरेगातून जसे अनुदान दिले जाते तसे सर्व जिल्ह्यातील बांबू लागवडीसाठी अनुदान मिळेल, असे मुंडे यांनी यावेळी सांगितले.

Crop insurance । पीक विमा रक्कम मिळवायची असेल तर ७२ तासात करा अर्ज, जाणून घ्या अर्जपद्धत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *