Crop insurance

Crop insurance । पीक विमा रक्कम मिळवायची असेल तर ७२ तासात करा अर्ज, जाणून घ्या अर्जपद्धत

बातम्या

Crop insurance । शेतकऱ्यांना सतत अवकाळी पाऊस, पूर यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. मागील काही वर्षांपासून या समस्या वाढल्या आहेत. शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता सरकारने पीक विमा योजनेला (Crop Insurance Scheme) सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे मागील काही वर्षात पीक विमा काढण्याचे प्रमाण वाढले आहे.

Success story । पारंपरिक शेतीला फाटा देत सांगलीच्या शेतकऱ्याने पिकवले पिवळे ड्रॅगन! मिळाला 38 हजाराचा दर

७२ तासांत दाखल करावा लागतो अर्ज

हे लक्षात घ्या की पीक विम्याची रक्कम मिळवण्यासाठी ७२ तासांमध्ये अर्ज (Crop insurance application) करण्याची गरज असते. त्यासाठी तुम्ही विमा उतरवलेल्या भागात ढगफुटी, अतिवृष्टी, दीर्घकाळ पाणी साचून झालेल्या नुकसानीची माहिती वेळेवर पीक विमा कंपनीला कळवावे लागते. जर तुम्ही तक्रार दिली नाही तर दखल घेतली जात नाही. तुम्हाला मदतीपासून वंचित राहावे लागेल. (How to apply crop insurance)

Udid Rate । उडदाला आज किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

तुम्ही कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज देखील सादर करू शकता. हा अर्ज दाखल करत असताना शेतकऱ्यांनी स्वतःचे नाव, बँकेचे नाव, मोबाइल क्रमांक, अधिसूचित मंडळ, आपत्ती प्रकार, बाधित पीक विमा भरल्याची पावती यांसारखी माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरून ती कृषी अधिकाऱ्यांकडे द्यावी लागते.

Onion Rate । सोलापूर, बारामती बाजारसमिती कांद्याला आज सर्वाधिक किती दर मिळाला?

ऑनलाइन करू शकता तक्रार

इतकेच नाही तर नुकसान झाल्यानंतर ७२ तासांमध्ये पीक नुकसानीचा पंचनामा करणारी समिती, स्थानिक कृषी सहायक अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी आणि तलाठी यांच्याकडे माहिती द्यावी लागते. पीक विमा कंपनीला तक्रार देण्यासाठी तुम्ही कृषी आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित केलेल्या अॅपवर ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.

बोअरवेल घेताना पाणी कुठे आहे कसे शोधायचं? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *