Garlic Price

Garlic Price । ऐकावं ते नवलच.. लसणाची चोरी होऊ नये म्हणून हातात बंदूका घेऊन राखली जातेय निगा

बातम्या

Garlic Price । दररोजच्या जेवणात लसणाचा वापर केला जातो. लसणामुळे (Garlic) जेवणाला चांगली चव येते. महत्त्वाचे म्हणजे जगात लसणाच्या व्यापारात चीनची बरोबरी कोणताही देश करू शकत नाही. आता भारतही चीनला मात देत आहे. भारताचा लसणाचा व्यापार सतत वाढत आहे. सध्या लसणाचे दर (Garlic Price Hike) गगनाला भिडले आहेत. यामुळे लसूण उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Sugarcane Farmers । ऊस नको रे बाबा..! जळालेल्या उसाचं चिपाड झालं आता तरी त्याची तोडणी करा, शेतकऱ्यांची भावनिक साद

हातात बंदूका घेऊन लसणाचे रक्षण

एकेकाळी कवडीमोल भावात लसूण आता ४०० रुपयांच्या वर गेला आहे. लसणाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने शेतकरीवर्ग आता सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. लसणाची चोरी होऊ नये म्हणून शेतकरी थेट लसणाच्या शेतात संरक्षणासाठी हातात बंदूका घेऊन तैनात झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. (Garlic rate hike)

Goat Farming Business । आता बिनधास्त करा शेळीपालन, ‘ही’ बँक देतेय 50 लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

दरम्यान, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचे गट तयार केले असून या गटाची एकूण तीन-चार शिफ्टमध्ये विभागणी केली आहे. त्यानुसार ते लसणाची पाहणी करत आहेत. मध्य प्रदेशातील आगर माळवा भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. लसणाची चोरी होऊ नये यासाठी शेतकरी हातात बंदुका, काठ्या घेऊन पिकाचे रक्षण करत आहे.

Gram Cultivation । शेतकऱ्यांनो, हरभऱ्यावर या औषधाचा करा वापर; होईल मोठा फायदा

गगनाला भिडले दर

लसणाच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे शेतातून लसूण चोरीला जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत असल्याने शेतकऱ्यांनी प्रत्येक प्रकारे आपली पिके वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. सध्या लसणाचा भाव वाढला असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढत आहे. अशा वेळी जर कोणी लसूण चोरी केला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

Eggs Rate । अंड्यांच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या नवीनतम दर

शेतकरी नेहमीच त्यांच्या पिकांची काळजी घेतात. त्याचे संरक्षण करतात, जेणेकरून वन्य प्राणी आणि भटके प्राणी त्यांच्या पिकांचे नुकसान करू शकत नाहीत. पण सध्या या भागातील शेतकरी थेट हातात बंदुका, काठ्या घेऊन पिकाचे रक्षण करत असल्याने यावर चर्चा होत असून सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Ethanol Production । मका उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! इथेनॉल निर्मितीसाठी होणार मकेची खरेदी, जाणून घ्या दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *