Goat Farming Business

Goat Farming Business । आता बिनधास्त करा शेळीपालन, ‘ही’ बँक देतेय 50 लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पशुसंवर्धन

Goat Farming Business । भारताकडे कृषिप्रधान देश म्हणून पाहिले जाते. देशात ऊस, गहू, कापूस, मका, ज्वारी यांसह अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते. परंतु अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त शेतीवरच चालत नाही. त्यामुळे ते शेतीसोबत एखादा जोडव्यवसाय करतात. यामध्ये शेळीपालन (Goat Farming) मोठ्या प्रमाणावर केले जाते. हा असा व्यवसाय आहे जो कमी जागेतही करता येतो.

PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट! खात्यात येणार करोडो रुपये, कसं ते जाणून घ्या

विशेष म्हणजे बाजारात शेळीचे दूध आणि मांसाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या व्यवसायातून (Goat rearing) अलीकडच्या काळात चांगली कमाई होत आहे. त्यामुळे अगदी सुशिक्षित लोकही नोकरी सोडून शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे कमी असतील तर काळजी करू नका आता तुम्हाला एक बँक मदत मिळेल. (Loan for Goat Rearing)

Havaman Andaj । हवामान खात्याचा शेतकऱ्यांना इशारा! विजांच्या गडगडाटांसह ‘या’ भागात अवकाळी पाऊस लावणार दमदार हजेरी

कृषी कर्ज शेळी-मेंढी पालन

आता आयडीबीआय बँकेकडून शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी कर्ज देण्यात येत आहे. बँकेच्या या योजनेचे नाव “कृषी कर्ज शेळी-मेंढी पालन” असे (Agricultural loan goat-sheep rearing) असून योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे जर आता तुम्हाला शेळीपालनासाठी कर्ज (Loan for goat farming) मिळवायचे असेल तर तुम्ही या बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकता.

Gram Cultivation । शेतकऱ्यांनो, हरभऱ्यावर या औषधाचा करा वापर; होईल मोठा फायदा

व्याजदर

ही बँक तुम्हाला 50 हजार रुपयांपासून ते 50 लाखांच्या दरम्यानच्या मर्यादेत तुमच्या प्रकल्प अहवालानुसार कर्ज देईल. कर्जासाठी 7 टक्के व्याजदर लागू असणार आहे.

Farmers Protest । विविध मागण्यांवर शेतकरी ठाम! देशभरात काढणार कँडल मार्च, सरकारचाही पुतळा जाळणार

आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
 • तुमचा शेळीपालन व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
 • बीपीएल कार्ड (उपलब्ध असेल तर)
 • जात प्रमाणपत्र (एससी, एसटी, ओबीसी असेल तर)
 • रहिवासी दाखला
 • उत्पन्नाचा दाखला

Eggs Rate । अंड्यांच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या नवीनतम दर

असा करा अर्ज

 • अर्जासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आयडीबीआय बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागणार आहे.
 • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रे जोडून तो बँकेत जमा करा.
 • बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल.
 • बँक तुमचा शेळीपालन व्यवसायाचा प्रकल्प अहवाल पाहून कर्ज मंजूर करण्याची प्रकिया पूर्ण करेल.

Ethanol Production । मका उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! इथेनॉल निर्मितीसाठी होणार मकेची खरेदी, जाणून घ्या दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *