Havaman Andaj

Havaman Andaj । हवामान खात्याचा शेतकऱ्यांना इशारा! विजांच्या गडगडाटांसह ‘या’ भागात अवकाळी पाऊस लावणार दमदार हजेरी

हवामान

Havaman Andaj । देशातील अनेक राज्यांना यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका चांगलाच सहन करावा लागत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे यंदा सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे (Heavy rain) शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. (IMD Alert)

Gram Cultivation । शेतकऱ्यांनो, हरभऱ्यावर या औषधाचा करा वापर; होईल मोठा फायदा

अवकाळी पाऊस लावणार दमदार हजेरी

हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. (Unseasonal rain) हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, आजपासून पुढचे चार दिवस म्हणजेच 29 फेब्रुवारीपर्यंत विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. जर यावेळी हवामानाने पिकांचे नुकसान केले तर शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फटका सहन करावा लागू शकतो. (IMD Update)

Farmers Protest । विविध मागण्यांवर शेतकरी ठाम! देशभरात काढणार कँडल मार्च, सरकारचाही पुतळा जाळणार

या भागात पडणार पाऊस

नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती या 5 जिल्ह्यात 25 ते 27 फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस विजांच्या गडगडाटांसह पावसाबरोबर गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मागील आठवड्यात विदर्भातील बहुतेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती.

Eggs Rate । अंड्यांच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या नवीनतम दर

या पावसाचा फटका बहुतेक भागातील रब्बीची पिके, भाजीपाला आणि संत्रा-मोसंबीच्या बहाराला चांगलाच फटका बसला होता. दरम्यान, यावर्षी पावसळ्याच्या दिवसात राज्याच्या अनेक भागात अपेक्षित पाऊस झाला नाही. याचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. या संकटातून शेतकरी सावरत असतनाच आता रब्बी हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसत आहेत.

Intercropping । शेतकरी बांधवांनो, उसात घ्या ‘ही’ आंतरपिके; अवघ्या 3 महिन्यात होईल लाखोंची कमाई

इतकेच नाही तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पश्चिम हिमालयीन प्रदेशातील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा जारी केला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 26 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, गिलगिट आणि 26 आणि 27 फेब्रुवारीला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल.

Ajit Pawar । ‘कांदा, सोयाबीन, कापसाच्या दरावरून आम्हाला राजकारण करायचं नाही’; अजित पवार स्पष्टच बोलले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *