Havaman andaj

Havaman andaj । राज्यातून थंडी गायब! ‘या’ ठिकाणी कोसळणार धो धो पाऊस, जाणून घ्या

हवामान

Havaman andaj । राज्यातील शेतकरी यंदा निसर्गापुढे हैराण झाले आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या (Western Disturbance) प्रभावामुळे देशासह राज्यातील वातावरणात सतत बदल (Change in environment) होताना दिसत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहे. पण या दिवसात देखील राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशातील अनेक भागात पावसाने हजेरी (Rain in Maharashtra) लावली आहे.

Mango Pest । आंब्यांला बसला हवामानाचा मोठा फटका! फुलकिडीने शेतकरी हैराण

जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा इशारा (IMD alert) दिला आहे. येत्या ५ दिवसांत महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.

Devendra Fadnavis । मोठी बातमी! कमी किमतीत कापूस खरेदी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

रब्बी हंगामातील पिकांची काळजी घेण्याचा सल्ला

भारताच्या मैदानी भागात हवामानाचे स्वरूप बदलणार आहे. १० ते १४ फेब्रुवारीदरम्यान देशातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे. हवामान खात्याने मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता (Heavy rain) वर्तवली आहे.

Agriculture Minister Arjun Munda । शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केली सर्वात मोठी घोषणा

पुणे, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर आणि सांगली येथे शनिवारी आणि रविवारी वातावरण ढगाळ राहील. तसेच या ठिकाणी पावसाची शक्यता देखील व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रातील काही भागातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

Biological Pesticides । आता शेतीचा खर्च होईल खूपच कमी, घरच्या घरीच तयार करा ‘हे’ जैविक कीटकनाशक

पुण्यातही पाऊस पडू शकतो. सध्या पुण्यातील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या वर असून आगामी चार ते पाच दिवसांत पुण्यात ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडेल. तसेच अरुणाचल प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, बिहार, सिक्कीम, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये येत्या ५ दिवसांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Black Soybean । शेतकऱ्यांनो, जास्त नफा मिळवायचा असेल तर करा काळ्या सोयाबीनची शेती, किलोला मिळतोय ‘इतका’ भाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *