Havaman Andaj । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. सध्या पाऊस परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र त्याआधी पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने सोमवारी महाराष्ट्रातील 25 पेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या काळामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Onion Rate । कांद्याला आज सर्वात जास्तीचा किती दर मिळाला? पाहा बाजारातील स्थिती
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर 22 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी
IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, नागपूर, गोंदिया, सांगली, पुणे आणि अहमदनगर इत्यादी जिल्ह्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Pomegranate Price । एका दिवसातच शेतकरी मालामाल! डाळिंबाला मिळाला ८०० रुपये किलोचा दर
विदर्भात मुसळधार पाऊस
आज पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या ठिकाणी येलो अलर्ट देखील जारी केला आहे. यंदाच्या वर्षी मान्सून महाराष्ट्रामधून ८ ते १० ऑक्टोबरच्या सुमारास मुंबई-पुणे येथून माघार घेण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे.