Pomegranate Price । मागच्या काही दिवसांपूर्वी टोमॅटोच्या दराने उचांकी गाठली होती. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी लखपती ते करोडपती झाले होते, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटोचे दर घसरले आहे. आता डाळिंबाला चांगला दर मिळत असल्याचे दिसत आहे. डाळिंबाला आतापर्यंत ८०० रुपये प्रति किलो उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अहमदनगरच्या राहता बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या डाळिंबाला आठशे रुपये प्रति किलो दर मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. पुणे जिल्ह्यामधील नारायणगाव या ठिकाणचे रहिवासी युवा शेतकरी रमेश गाडेकर हे आपल्या शेतात कायम डाळिंबाची बाग लावतात. यावेळी देखील त्यांनी डाळिंब लागवड केली आणि डाळिंब विक्रीसाठी त्यांनी राहता बाजार समितीत नेले. यावेळी त्यांच्या डाळिंबाला चांगला दर मिळाला आहे.
Voter ID Card । मस्तच! आता मोबाईलच्या मदतीने तयार करता येणार मतदान कार्ड
रमेश गाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या इतर डाळिंबाला सरासरी तर भगवा व्हरायटीला हमाली, तोलाई आणि इतर खर्च वजा करता प्रति किलो 800 रुपयांचा दर मिळाला आहे, या व्हरायटीच्या 26 किलो डाळिंबाला 16 हजार रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Sheep Farming । आजच सुरु करा कमी खर्चात मेंढीपालनाचा व्यवसाय, या प्रजातींचे करा संगोपन
दरम्यान, याआधी कधीही राहता बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या डाळिंबाला एवढा चांगला दर मिळाला नव्हता मात्र यावेळी ८०० रुपये प्रति किलो दर मिळालेला सर्वात जास्त दर असल्याचा दावा शेतकरी आणि तेथील व्यापाऱ्यांनी देखील केला आहे.
LPG Cylinder Price । मोठी बातमी! गॅस सिलेंडरच्या किमतींत तब्बल 209 रुपयांची वाढ