Tur Market

Tur Market Price । तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तुरीचे दर लवकरच गाठू शकतात 12 हजारांचा टप्पा

बाजारभाव

Tur Market Price । यंदा झालेल्या अवकाळी पावसाने तुरीचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच आता नवीन हंगामात तुरीला चांगला भाव मिळत आहे. येत्या काही दिवसात आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Milk Rate । आनंदाची बातमी! अनुदानासह गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रूपये दर जाहीर

सध्या तुरीची काढणी सुरु आहे. शेतकरी काढणी झाल्यांनतर बाजारात विक्री करत आहेत. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण तुरीने नुकताच दहा हजारांचा टप्पा पार केला आहे लवकरच ही तुर 12 हजारांचा टप्पा पार करू शकते. अकोला कृषी बाजार समितीत तुरीची दरवाढ पहायला मिळाली.

Grapes Export । द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा! निर्यातीबाबत अजित पवारांनी दिले ‘हे’ आश्वासन

तुरीचे वाढले दर

दरम्यान, राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीचे दर दहा हजार रूपयांवर गेले आहे. अकोला कृषी बाजार समितीत देखील तुरीचे दर वाढलेले पहायला मिळाले. या बाजार समितीत तुरीला 10,400 रूपये प्रति क्विंटलप्रमाणे दर मिळत आहे. पुढील काही दिवसांत तूरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता बाजार समितीतील कृषी अभ्यासकांकडुन वर्तवण्यात आली आहे.

Government Schemes । तुम्हालाही शेततळं हवंय? तातडीने करा ‘या’ ठिकाणी अर्ज

यावर्षी पावसामुळे देशातील सर्वच उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. राज्यातील सर्वच बाजार समितीत तुरीला चांगली मागणी आहे. दर चांगले मिळत असल्याने तूर उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. येत्या काळात हे दर आणखी वाढू शकतात.

लवकरच पार करणार १२ हजारांचा टप्पा

गेल्या वर्षातील 1 डिंसेबर 2023 रोजी तुरीला किमान दर 8 हजार पासून कमाल दर 10 हजार रूपये होता. त्यानंतर या दरात घसरण झाल्याची पाहायला मिळाली होती. या नववर्षात तुरीच्या दरात सुधारणा होत आहे. फ्रेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तुरीचे दर १२ हजार रूपयांवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Animal Care । जनावरांना सर्पदंश झालाय? घाबरू नका अशाप्रकारे करा प्रथमोपचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *