Milk Rate

Milk Rate । आनंदाची बातमी! अनुदानासह गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रूपये दर जाहीर

बातम्या

Milk Rate । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर कमालीचे घसरले (Milk Rate Falls) आहेत. घसरलेल्या दरांमुळे दूध उत्पादक शेतकरी निराश झाले आहेत. या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय पशुखाद्य देखील खूप महाग झाले आहे. शेतकरीवर्ग दुधाचे दर वाढवण्यासाठी आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन (Strike for Milk Rate) करताना पाहायला मिळत आहे.

Pomegranate Farming । डाळिंब फुगवायचं असेल तर करा ‘हे’ उपाय, मिळेल भरघोस उत्पादन

गोकुळकडून प्रतिलिटर ३८ रूपये दर जाहीर

अशातच आता दूध उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदानासह (Gokul Milk Subsidy) गोकुळच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रुपये दर देण्यात येणार आहे. दरम्यान, मागील चार महिन्यांपासून राज्यातील गाय दूध खरेदी दरामध्ये घसरण होत आहे. परंतु गोकुळने गाईच्या दुधाचे दर (Gokul Cow Milk) प्रतिलिटर ३३ रुपये ठेवले आहे.

Devendra Fadnavis । जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजनेतील कामे तातडीने पूर्ण करा; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

गोकुळकडून प्रतिदिनी २० लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प करण्यात आला आहे. लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने गोकुळने १७ लाख लिटर्स दूध संकलनाचा टप्पा पार करण्यात आला आहे. संघाने विविध योजना, सेवा सुविधा दूध उत्पादकांना उपलब्ध करुन दिल्या असून अनुदानासह (Milk Subsidy) गोकुळच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रुपये दर देण्यात येईल, अशी माहिती गोकुळ संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली आहे.

Mahatama Phule Karj Yojana । शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत वाढ, प्रोत्साहन अनुदानाबाबत बैठक पडली लांबणीवर

दरम्यान, राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघानी ३.५ फॅट व ८.५ एस.एन. एफ. करिता किमान प्रतिलिटर २७ रुपये दर देणे सरकारने अनिवार्य केले आहे. सध्या गोकुळचा गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन. एफ. साठी प्रतिलिटर ३३ रुपये इतका आहे. कोल्हापूर जिल्ह्यात संकलित होणाऱ्या गायीच्या एकूण दुधापैकी प्रतिदिनी जवळपास ७ लाख लिटर आहे.

Animal Care । जनावरांना सर्पदंश झालाय? घाबरू नका अशाप्रकारे करा प्रथमोपचार

दूध उत्पादकांना काहीसा दिलासा

हे दूध गोकुळकडून संकलित केले जात आहे. विशेष म्हणजे पाच रुपये अनुदान हे थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे आता गोकुळकडून उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रुपये उच्चांकी दर मिळणार आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दूध उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Government Schemes । तुम्हालाही शेततळं हवंय? तातडीने करा ‘या’ ठिकाणी अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *