Mahatama Phule Karj Yojana । केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Government schemes) सुरु करत असते. ज्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. पीएम मानधन योजना, पीएम किसान योजना, मागेल त्याला शेततळे योजना यांसारख्या अनेक योजना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी (Schemes for farmer) सुरु करण्यात आल्या आहेत. पण यातील काही शेतकरी असे आहेत ज्यांना या योजनेची माहिती नसते. त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही.
Animal Care । जनावरांना सर्पदंश झालाय? घाबरू नका अशाप्रकारे करा प्रथमोपचार
प्रोत्साहनपर अनुदान
दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. पण शेतकऱ्यांना अजून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. आतुरतेने ते सरकारी अनुदानाची वाट पाहत आहेत. यासंदर्भात मागील काही दिवसांपूर्वी शिरोळ येथील आंदोलन अंकुशच्या वतीने जिल्हा बँकेसमोर आंदोलन करण्यात आले होते.
Government Schemes । तुम्हालाही शेततळं हवंय? तातडीने करा ‘या’ ठिकाणी अर्ज
यावेळी आंदोलकांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून सहकार मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. इतकेच नाही तर याबाबत मंत्रालयात बैठक बोलवली आहे, अशी माहिती देखील आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिली होती. पण अजूनही यावर कोणताच तोडगा निघाला नाही.
कधी होईल बैठक?
आता सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत होणारी बैठक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अनुदानासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील पात्र शेतकऱ्यांना दोन टप्प्यात पैसे दिले असून तिसरा टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही.
Success Story । मेहनतीच्या जोरावर दोन भावांनी केली शेततळ्यात शिंपल्यांची शेती, असं केलं नियोजन
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यामुळे राज्य सरकारला बैठक घेण्यास वेळ मिळत नाही. दरम्यान, कर्ज परतफेडीचा कालावधी आणि आर्थिक वर्षामुळे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे बैठक लांबणीवर टाकण्यात आली आहे. बैठक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, असे आश्वासन वळसे-पाटील यांनी दिले आहे, अशी माहिती धनाजी चूडमंगे यांनी दिली आहे.
Wild Animal । जंगली प्राण्यांमुळे पिकांची नासाडी होतेय? गोमुत्राचा असा करा वापर