Dairy Business Scheme

Dairy Business Scheme । ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊन करा दुग्धव्यवसाय, व्याजाशिवाय मिळेल कर्जाचा लाभ

शासकीय योजना

Dairy Business Scheme । अलीकडच्या काळात शेती आणि शेतीशी निगडित व्यवसाय (Business related to agriculture) करण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण यामध्ये नोकरीपेक्षा जास्त कमाई करता येते. त्याशिवाय नोकरीवरून अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत. तर काहीजण नोकरीकडे पाठ फिरवत आहेत. सरकार देखील विविध योजनांची (Government Schemes) अंमलबजावणी करत आहेत.

Onion Export Ban । कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना मोठा फटका! दरात झाली 50 टक्क्यांची घसरण, पाहा किती मिळतोय दर?

ज्याचा त्यांना लाभ होतो. समजा आता तुम्हाला जर दूध व्यवसाय (Dairy Business) सुरू करायचा असल्यास तर त्यासाठी तुम्हाला गाय किंवा म्हशीचे पालन करावेच लागते. परंतु सध्याच्या घडीला गाय किंवा म्हशींच्या किमती पाहिल्या तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या त्या बजेटबाहेर आहेत. शेतकऱ्यांना आता किमती वाढल्याने जास्त पैसे देऊन जनावरे खरेदी करावे लागत आहे.

Subsidy for irrigation । शेतकऱ्यांनो, त्वरा करा; ठिबक आणि तुषार सिंचनासाठी मिळतंय अनुदान, सोप्या प्रकारे करा अर्ज

पशु किसान क्रेडिट कार्ड

2024 या वर्षापासून पशुपालकांना पशु किसान क्रेडिट कार्ड (Pashu Kisan Credit Card) वाटपाची योजना सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले जात आहे. क्रेडिट कार्डच्या मदतीने शेतकऱ्यांना त्यांच्या बजेटनुसार कर्ज मिळते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक गाय खरेदीसाठी साठ हजार 783 रुपये तर एक म्हैस खरेदीसाठी 70249 रुपये कर्ज मिळेल.

Milk Rate । दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! अनुदानासाठी ‘या’ जिल्ह्याला दररोज मिळणार ११ लाख रुपये

सरकारी मदत घेऊन आता तुम्ही डेअरी व्यवसाय सुरु करू शकतात. सर्वात आनंदाची बाब म्हणजे तुमच्याकडून शून्य टक्के व्याज आकारले जाते. यामध्ये सात टक्के व्याजदराने हे कर्ज मिळत असते. केंद्र सरकार तीन टक्के आणि राज्य सरकार चार टक्के व्याज भरत असते. जर दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केली तर त्यांना व्याजात सूट मिळते, हे लक्षात ठेवा.

How to get government land on rent । सरकारी जमीन भाड्याने कशी मिळवायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, आपल्या पशुचे विमा प्रमाणपत्र, पशु आरोग्य प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, सिबिल स्कोर उत्तम असावा, मतदान कार्ड आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे. बँकेमधून तुम्ही अर्ज घेऊन तो बँकेच्या अधिकाऱ्यांकडे तो कागदपत्रांसहित जमा करू शकता.

Business Idea । शेतीसोबत मोबाईल टॉवर लावा, लाखो रुपयांचा होईल नफा; जाणून घ्या कसं ते?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *