Subsidy for irrigation । शेतकऱ्यांना सतत नैसर्गिक संकटांचा (Natural disasters) सामना करावा लागतो. विविध संकटे आणि वाढती महागाई यामुळे शेतकऱ्यांना जास्त खर्च येतो. अनेकदा शेतकऱ्यांचे उत्पादन जास्त आणि उत्पन्न (Income) कमी होते. अशावेळी नाइलाजाने काही शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. हीच समस्या लक्षात घेता सरकार विविध योजना (Government Schemes) सुरु करत असते. ज्याचा त्यांना लाभ होतो.
Milk Rate । दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! अनुदानासाठी ‘या’ जिल्ह्याला दररोज मिळणार ११ लाख रुपये
शेतकऱ्यांना आता ठिबक, तुषार सिंचनासाठी अनुदान (Subsidy for Drip, Frost Irrigation) मिळत आहे. परंतु, तुम्हाला याचा लाभ लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे, कारण अनुदानासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेत (National Agricultural Development Scheme) अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार यांसारख्या सूक्ष्म सिंचन तंत्राचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) अर्ज करावा लागणार आहे. (Government Subsidy)
How to get government land on rent । सरकारी जमीन भाड्याने कशी मिळवायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
किती मिळणार अनुदान?
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अनुसूचित जमातींसाठी तब्बल पावणेसात लाख रुपयांचे अनुदान शिल्लक आहे, जर अनुसूचित जातींचे अर्ज आले तर त्यानुसार अनुदानाची मागणी केली जाईल, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब जास्त पीक सूक्ष्म सिंचन योजनेच्या २०२३-२४ या वर्षासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या ५५ टक्के व भूधारकांना ४५ टक्के अनुदान मिळणार आहे.
Business Idea । शेतीसोबत मोबाईल टॉवर लावा, लाखो रुपयांचा होईल नफा; जाणून घ्या कसं ते?
या लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांती योजनेत ३५ टक्के व ४५ टक्के पूरक अनुदान मिळणार आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान मिळेल. वास्तविक, अर्ज दाखल करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ही क्षेत्रीय स्तरावर मोहीम राबविली जात आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अजर करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.
महत्त्वाची कागदपत्रे
अर्ज दाखल करण्यासाठी तुमच्याकडे ८ अ उतारा, सातबारा, बँक पासबुक, आधार कार्ड, आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असावी आणि त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असावी. समजा नोंद नसेल तर विहीर, शेततळे यांबाबत स्वयंघोषणापत्र द्यावे. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.