Jumbo Sprayer Machine । शेतकऱ्यांना शेती करत असताना वेळोवेळी पिकांवर फवारणी करावी लागते. जर पिकांवर वेळोवेळी फवारणी केली तरच आपले पीक कीटकांपासून मुक्त राहते नाहीतर पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग देखील पडतो. त्यामुळे पिकांवर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास देखील सहन करावा लागतो. पाठीवर पंप घेऊन फवारणी करण्यासाठी देखील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी मजूर देखील उपलब्ध होत नाहीत, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा यामध्ये जास्त वेळ देखील जातो आणि कामही कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आता काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. सध्या देखील शेतकऱ्यांसाठी फवारणीसाठी एक जम्बो फवारणी यंत्र (Jumbo Sprayer Machine) बाजारात आले आहे.
पुण्यातील मोशी या ठिकाणी झालेल्या किसान प्रदर्शनामध्ये हे जम्बो फवारणी यंत्र आपल्याला पाहायला मिळाले आहे. या फवारणी यंत्राद्वारे शेतकरी एका तासात चार ते सव्वाचार एकर क्षेत्रावर फवारणी करू शकतात. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये एकाच वेळेस सहाशे लिटर पाणी साठवून ठेवण्याची देखील क्षमता आहे. यासाठी इंधनाबद्दल जर पाहिले तर चार ते सव्वाचार एकर फवारणी करण्यासाठी तीन ते साडेतीन लिटर इंधनाची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे यंत्र अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
Havaman Andaj । मोठी बातमी! या भागात आजही पाऊस पडण्याची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज