Artificial Intelligence

Artificial Intelligence । आर्टिफिशीयल इंटेलिजन्सवर होणार उसाची शेती? कसं काम करत हे तंत्र? जाणून घ्या

तंत्रज्ञान

Artificial Intelligence । भारत हा असा देश आहे जिथे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड (Cultivation of sugarcane) केली जाते. हमखास भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. (Sugarcane Cultivation Benefits) उसाच्या अनेक जाती आहेत. शेतकरी आता उसाच्या पिकात देखील नवनवीन तंत्रज्ञाचा वापर करू लागले आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. तुम्ही मागील काही दिवसांपासून आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञाचे नाव ऐकले असेल.

Government Schemes । शेतकऱ्यांनो, ड्रीपसाठी तुम्हीही करू शकता अर्ज? ‘हे’ कागदपत्रे लागतात; जाणून घ्या किती मिळेल अनुदान?

आर्टिफिशीयल इंटेलिजन्स

आता आर्टिफिशीयल इंटेलिजन्सच्या मदतीने उसाची शेती (AI work in sugarcane) केली जात आहे. हे तंत्र शेतीचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी फायद्याचे ठरेल. मातीतील सर्व घटक, जसे की, अन्नद्रव्यांचे प्रमाण, मातीची घनता, त्या मातीत उगविणाऱ्या वनस्पतीच्या पानातील प्रकाश संश्लेषणाचा वेग, सभोवतालच्या परिस्थितीत संभाव्य येऊ घातलेले रोग, सामू, क्षारता, आर्द्रता, सेंद्रीय कर्ब, किडीचे पूर्वानुमान, म्हणजेच मातीतील रासायनिक, भौतिक घटकांची रिअल टाईम मूल्यमापन, परिसरातील भौगोलिक बदल अगदी सहजपणे व वारंवार टिपून ते शेतकऱ्यांना थेट पोचविण्याचे काम शेतीतील कृत्रिम बुध्दीमत्तेचे तंत्र करते.

Agriculture News | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार जास्त भरपाई

तसेच शेती उत्पादनाशी निगडित कोणताही संभाव्य धोका आणि त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्याचे काम हे तंत्र करते. १८ ते २२ जानेवारीदरम्यान बारामतीत अ्ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनात तुम्हाला हे तंत्र पाहायला मिळेल. दरम्यान, प्रत्यक्षात उसापासून ते स्ट्रॉबेरीपर्यंत, हळदीपासून ते खरबूजापर्यंतची अनेक पिके कृत्रिम बुध्दीमत्तेद्वारे घेण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून येथे काम सुरू आहे.

Dog Race। ऐकावं ते नवलच! शेतकऱ्याला कुत्रीने जिंकून दिल्या ६ चांदीच्या गदा, ३ फ्रिज आणि ४ बाइक

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमीनीत उपलब्ध असलेले अन्नद्रव्ये, जसे की, नत्र, गंधक, कॅल्शिअम, स्फूरद, पालाश, लोह, जस्त, तांबे, बोरॉन, मंगल मोलिब्डेनम अशांचे प्रमाण वस्तुस्थितीवर आधारीत सहज मिळत नाही. त्यांचे प्रमाण रासायनिक पृथ्थकरणाद्वारे तिथेच तपासून विश्लेषित अहवालासह अगदी काही क्षणात देण्याची क्षमता या आर्टिफिशीयल इंटेलिजन्समध्ये आहे.

Shakira Cow । नादच खुळा! ‘या’ शेतकऱ्याची गाय दिवसाला देते 80 लिटर दूध, अशाप्रकारे केले जाते संगोपन

काय होणार फायदा?

उसाच्या वाढीच्या अवस्थेत लागणारे अन्नद्रव्य योग्य प्रमाणात समजण्यासाठी या तंत्राचा फायदा होईल. फुटवे, कांडीची लांबी, कांडीमूळ, कोंबमूळ तसेच उसाचे वजन, उसाचा साखर उतारा, एकरी उत्पादन, तोडणीस येणाऱ्या उसाची एका एकरातील अपेक्षित आणि वाजवी संख्या या साऱ्यांमध्ये वाढ होऊन उत्पादन वाढीसाठी याचा फायदा होणार आहे.

Farmers Interest Waive : मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *