Farm Pond Scheme

Farm Pond Scheme । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून २३ हजार शेततळ्यांना मंजुरी

शासकीय योजना

Farm Pond Scheme । केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना (Govt Scheme) सुरु करत असते. ज्याचा आज देशातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. सरकारच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांना (Scheme for farmer) काहीसा दिलासा मिळतो. परंतु, असेही काही शेतकरी आहेत ज्यांना सरकारी योजनांबद्दल माहिती नसते. दरम्यान, सरकारकडून शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे.

Artificial Intelligence । आर्टिफिशीयल इंटेलिजन्सवर होणार उसाची शेती? कसं काम करत हे तंत्र? जाणून घ्या

२३ हजार शेततळ्यांना मंजुरी

काही दिवसांपासून सरकारकडून मागेल त्याला शेततळे योजना (Pond Scheme) सुरु केली आहे. दरम्यान, सोडत पद्धत रद्द करुन ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर आतापर्यंत २३ हजार नवीन शेततळ्यांना मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून सामूहिक शेततळ्यांसाठी २००९ पासून अनुदान देण्यास सुरुवात केल्यानंतर तळे खोदाईकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. (Govt Pond Scheme)

Government Schemes । शेतकऱ्यांनो, ड्रीपसाठी तुम्हीही करू शकता अर्ज? ‘हे’ कागदपत्रे लागतात; जाणून घ्या किती मिळेल अनुदान?

मागेल त्याला शेततळे योजना

पुढे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये वैयक्तिक स्तरावर ‘मागेल त्याला शेततळे’ ही स्वतंत्र योजना सुरु केली. पण त्यावेळी अनुदान फक्त ५० हजार रुपये होते. त्यामुळे या योजनेचा अपेक्षित प्रसार झाला नाही. माहितीनुसार, २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेत शेततळ्याचा समावेश झाला आणि अनुदानदेखील ७५ हजार रुपयांपर्यंत वाढविले.

Agriculture News | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार जास्त भरपाई

योजनेच्या रक्कमेत वाढ केल्याने आता शेततळे खोदाईसाठी शेतकरी पुन्हा उत्सुकता दाखवू लागले आहेत. अर्ज केल्यानंतर सोडत काढली जात होती,त्यामुळे अनुदान मिळते की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत होता. सोडतीत अर्ज मंजूर झाले नाही तर इच्छा असूनही तळे खोदता येत नव्हती. परंतु आता सोडत पद्धत हटवून अर्ज करताच शेततळे देण्याचे धोरण सरकारने आले आहे.

Dog Race। ऐकावं ते नवलच! शेतकऱ्याला कुत्रीने जिंकून दिल्या ६ चांदीच्या गदा, ३ फ्रिज आणि ४ बाइक

त्यामुळे राज्यात आता पहिल्याच टप्प्यात सहा हजाराच्या आसपास नवीन शेततळी खोदण्यात आली आहेत. दरम्यान, या सरकारी योजनेचा लाभ घेण्यात अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पहिल्या स्थानावर आहेत. योजनेसाठी ३४ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यापैकी केवळ पाच हजार शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा केली. त्यातून ४३०० शेतकऱ्यांना तळे खोदण्यास पूर्वसंमती दिली.

Shakira Cow । नादच खुळा! ‘या’ शेतकऱ्याची गाय दिवसाला देते 80 लिटर दूध, अशाप्रकारे केले जाते संगोपन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *