Government Schemes । शेतीसाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. पाणीच नसेल तर पिके जळून जातात. यंदा असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने शेतकरीवर्ग संकटात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत विविध योजना (Agri Schemes) सुरु करत असते.
सूक्ष्म सिंचन योजना
यापैकीच एक योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रतिथेंब अधिक पीक म्हणजेच सूक्ष्म सिंचन योजना (Micro Irrigation Scheme) होय. आता तुम्ही देखील सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेऊ शकता. हे लक्षात घ्या की या योजनेमध्ये केंद्र सरकारचा 60 टक्के आणि राज्य शासनाचा 40 टक्के हिस्सा असून राज्यातील एकूण ३४ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे. (Irrigation Scheme)
Dog Race। ऐकावं ते नवलच! शेतकऱ्याला कुत्रीने जिंकून दिल्या ६ चांदीच्या गदा, ३ फ्रिज आणि ४ बाइक
अनुदानाचा विचार करायचा झाला तर ठिबक व तुषार संच उभारणीसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत दिले जाते. ठिंबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते. ठिंबक सिंचनामुळे जमिनीत वाफसा कायम राहतो. विद्राव्य खाते वेंचुरी/फर्टिलायझर टॅकद्वारे पाण्यात मिसळून पिकांच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार देता येतात. (Micro Irrigation Scheme Application)
Shakira Cow । नादच खुळा! ‘या’ शेतकऱ्याची गाय दिवसाला देते 80 लिटर दूध, अशाप्रकारे केले जाते संगोपन
ठिंबक सिंचनामुळे पाण्याची आणि वेळेची बचत होते, त्यामुळे जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज (Irrigation Scheme Application) करायचा असेल तर तुम्ही https://mahadbt.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर भेट देऊ शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सन २०२२-२३ मध्ये या योजनेसाठी एकूण रु.५५६.६६ कोटी निधी उपलब्ध झाला आहे.
असा करा अर्ज
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करून आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करावे लागणार आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन “शेतकरी योजना” हा पर्याय निवडू शकता. इतकेच नाही तर शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उपरोक्त संकेतस्थळावर जाऊन देखील अर्ज करु शकतात.
Farmers Interest Waive : मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी
आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे तपशील
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- ठिबक सिंचनासाठी माती आणि पाणी चाचणी अहवाल आणि रचना
- वीज बिल किंवा पंपसेट खरेदी बिल
- सूक्ष्म सिंचन संयंत्राच्या नोंदणीकृत उत्पादकाने जारी केलेले बिल