Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! येत्या गुरुवारी खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

शासकीय योजना

Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आणत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नमो शेतकरी योजनेची सुरुवात केली आहे. याचा लाभ देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. आता या योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Sugarcane crushing season । आनंदाची बातमी! 1 नोव्हेंबरला पेटणार साखर कारखान्याचे धुराडं

दरम्यान, नमो शेतकरी योजनेचे (Namo Shetkari Sanman Scheme) 6000 रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हफ्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पीएम किसानसाठी पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Dhananjay Munde । कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात येणार

१ हजार ७२० कोटींचा निधी होणार वितरित

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पहिल्या हप्त्याचे वितरण गुरुवारी (ता. २६) केले जाणार आहे. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे वितरण केले जाईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. दरम्यान, १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. महाआयटीने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे हा हप्ता येण्यास उशीर झाला होता.

Havaman Andaj । मोठी बातमी! मध्य महाराष्ट्रासह आज ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाची माहिती

अशातच आता राज्य सरकारच्या नमोची लाभार्थी संख्या नेमकी किती आहे याबाबत अजूनही कोणती स्पष्टता झाली नाही. केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली असून याच धर्तीवर आता राज्य सरकारने महासन्मान योजनेची घोषणा केली आहे.

Soybean Rate । सोयाबीनला बाजारात आज किती भाव मिळाला? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *