Dhananjay Munde । पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी राज्यस्तरीय रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा संपूर्ण आढावा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. यावेळी रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कुठेही लिंकिंग होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
रब्बी हंगामाचे एकूण क्षेत्र सुमारे 58 लाख हेक्टर असून या क्षेत्रात किमान 5 लाख हेक्टरची वाढ करण्यात यावी, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून 3 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ज्वारीच्या मिनिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. असे देखील यावेळी कृषिमंत्री म्हणाले आहेत.
पारंपरिक ज्वारी, गहू, मका, हरभरा याचबरोबर करडई, मसूर, राजमा, पावटा, वाल, मोहरी, जवस याही पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशाही सूचना केल्या आहेत. बियाणे, खते यांची उपलब्धी शेतकऱ्यांना माहीत असावी, यासाठी जिल्हा स्तरावर डॅश बोर्ड विकसित केले जातील. पीक कर्ज वाटपाचे संनियंत्रण आयुक्त स्तरावरून दर आठवड्याला केले जाईल.
Onion Rate । सोलापूर बाजारसमितीत आज कांद्याला किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
शेतकऱ्यांचे हित जोपासताना गरज भासल्यास शासकीय कॅनव्हासच्या बाहेर जाऊन काम करावे, मात्र आता शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सर्वांनी मिळून काम करावे, अशी अपेक्षा देखील धंनजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली
Soybean Rate । सोयाबीनला बाजारात आज किती भाव मिळाला? जाणून घ्या