Sugarcane crushing season । दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी उसाचे उत्पादन घटले आहे. याला कारण आहे पाऊस. यंदा राज्यात पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नाही. त्याचा फटका उसाला झाला आहे. अशातच सर्वांचे लक्ष गळीत हंगामाकडे (Sugarcane season) लागले होते. याच संदर्भात एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली.
या बैठकीत ऊसाचा गळीत हंगाम (Fall season) 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पाच टक्के घट ऊसाच्या उत्पादनात येऊ शकते. दरम्यान, ऊसाचे घटलेले उत्पादनामुळे यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरला सुरु करण्याची आवश्यकता काही जणांकडून व्यक्त केली होती.
परंतु, यंदा अपेक्षीत पाऊस न झाल्यानं चालू ऑक्टोबर महिन्यात साखर कारखाने सुरु होण्याची शक्यता खूप कमी होती. अशातच आता 1 नोव्हेंबर 2023 पासून यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. दरम्यान, यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांत गुऱ्हाळघरे आणि खांडसरी सुरू झाल्या असून अनेक शेतकरी आपला ऊस याठिकाणी देत आहेत.
Soybean Rate । सोयाबीनला बाजारात आज किती भाव मिळाला? जाणून घ्या
तसेच देशातील साखर उत्पादनापैकी एकूण एक तृतीयांश साखर उत्पादन राज्यात होते. नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने ऊसाचा गळीत हंगाम चालेल. समजा जर गाळप हंगाम उशिरा सुरु झाल्यास काही शेतकरी गाळपासाठी अन्य पर्याय स्वीकारण्याची शक्यता आहे. परंतु याचा फटका साखर कारखान्यांना बसेल.