Havaman Andaj । सध्या राज्यभर उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मात्र पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे काहीसा दिलासा देखील मिळत आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उर्वरित राज्यात मुख्यत; कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील दोन-तीन दिवसात दक्षिण भारतामध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर राजस्थान हरियाणामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली असून अंदमान समुद्रातील चक्राकार वाऱ्यांपासून ते श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विरला आहे. (Havaman Andaj)
Onion Rate । सोलापूर बाजारसमितीत आज कांद्याला किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरळकी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे.