Havaman Andaj । आता देशभरात थंडीने आपले तीव्र स्वरूप दाखवायला सुरुवात केली आहे. घटत्या तापमानामुळे भारतातील विविध शहरांमध्ये ब्लँकेट आणि रजाईही बाहेर काढण्यात आली आहे. अशा स्थितीत हवामान खात्याचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत देशातील विविध राज्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे तापमानात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
Onion Price । कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! महिन्यातच दरात मोठी घसरण
IMD च्या म्हणण्यानुसार, आजपासून 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत, गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र; दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय या काळात या राज्यांमध्ये वादळही येऊ शकते, असेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. (Havaman Andaj)
Red Chilli । लाल मिरचीची आवक वाढली! प्रतिक्विंटल मिळतोय तीन हजार ते साडेसहा हजारांचा दर
पुढील २४ तासांत या राज्यांमध्ये पाऊस पडेल
स्कायमेट हवामान अहवालानुसार, देशात पुढील २४ तासांत तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 26 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरात आणि दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असाही अंदाज आहे. याशिवाय केरळ आणि दक्षिण कर्नाटकात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Government Subsidy । सोडू नका अशी संधी! कृषी यंत्रांवर मिळत आहे 50 टक्के अनुदान, आजच करा अर्ज
त्याचबरोबर, हवामान खात्याचा अंदाज आहे की, 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र; दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विविध जिल्ह्यांमध्ये पावसामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे.
महारष्ट्रात पावसाची स्थिती कशी?
हवामान विभागाने महारष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पालघर, बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जोरदार विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Success Story । दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेतकऱ्याची कमाल! पपईतून घेतले विक्रमी उत्पादन