Success Story । शेती म्हटली की संकटे आलीच. शेतकरी या संकटांवर मात करत शेतीतून भरघोस नफा मिळवतात. शेती करताना योग्य नियोजन आणि मेहनत गरजेची असते. एखादी गोष्ट मनावर घेतली तर काहीही अशक्य नसते, याची प्रचिती अनेकदा आपल्याला येते. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याची दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. या परिस्थितीवर मात करत एका शेतकऱ्याने घवघवीत यश मिळवले आहे.
Wheat Farming । शेतकऱ्यांनो, गव्हाच्या पिकाला किती दिवसांनी पाणी द्यावे? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला
अशी केली लागवड
मंगेश धनासुरे असं या शेतकऱ्याचे नाव आहे. ते लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात राहतात. मंगेश धनासुरे यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीने पिकाची लागवड (Farmer Success Story) केली आहे. महत्त्वाचे म्हणजे लातूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे. तरीही त्यांनी योग्य ते नियोजन करत एकूण सात हजार रुपयांच्या रोपांची लागवड (Papaya cultivation information) केली. रोपांच्या किमतीचा विचार केला तर डिसेंबर 2022 मध्ये 11 रुपयाला एका पपईचा दर (Papaya Price) होता.
परराज्यात विक्री
त्यांनी एकूण 900 रोपांची प्रतिकर लागवड केली असून लागवड (Papaya cultivation) केल्यानंतर अवघ्या 8 महिन्यात पपई तोडणीला आली. त्यांनी पिकवलेल्या पपईला परराज्यासह राज्यातील बाजारात मोठी मागणी आहे. दिल्लीच्या बाजारातही त्यांच्या पपईची विक्री होते. आतापर्यंत त्यांना पपई फळबागतून दर चांगला मिळाले असून त्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.
कमाई आणि खर्च
सध्या पपईला 25 ते 30 रूपये प्रति किलोला दर मिळत आहे. जर पुढेही पपईचे असेच दर राहिले तर त्यांना 60 ते 70 लाख रुपयांचं उत्पादन मिळेल. मंगेश यांना लागवडीपासून आतापर्यंत 6 लाख रुपयांचा लागवड खर्च आणि एकूण खर्च जाऊन त्यांना निव्वळ 18 लाखांचा नफा झाला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करत या शेतकऱ्याने भरघोस उत्पादन मिळवल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पपई लागवडीसाठी माती आणि वर्गीकरण
पपई लागवडीसाठी 6.5-7.5 pH मूल्य असणारी हलकी चिकणमाती सर्वात उत्तम आहे. या मातीच्या मदतीने तुम्हाला मेथी, हरभरा आणि सोयाबीन इत्यादी कडधान्य पिके सह-पिके म्हणून घेता येतील. पपई पूर्ण पिकल्यास तसेच ती मध्यभागी पिवळसर दिसू लागल्यावर देठासह पपई काढून घ्यावी. पपई वेगवेगळ्या आकाराचे असेल तर तिचं वर्गीकरण करावे.
अशी तयार करा रोपे
तुम्ही देखील पपईची रोपे तयार करू शकता. 500 ग्रॅम बियाण्यांसह, एक हेक्टरचे एक रोप तयार करता येईल. लागवड करण्यापूर्वी शेत चांगले तयार करून सपाटीकरण करा. त्यानंतर तयार रोपे खड्ड्यांमध्ये लावा. रोपे लावताना माती आणि शेण टाका ज्यामुळे झाडे लवकर वाढतील.
Corn Crop Management । मका लागवड करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, मिळेल भरघोस उत्पादन