Agriculture Electricity

Agriculture Electricity । चिंता मिटली! डीपी जळाल्यास तीनच दिवसात होणार दुरुस्त, त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम

बातम्या

Agriculture Electricity । शेतीला पाणी देण्यासाठी वीज खूप महत्त्वाची आहे. जर वीज (Electricity) नसेल तर शेतीला पाणी देता येत नाही, परिणामी पिके जळून जातात. यावर्षी पावसाने राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आले आहे. शेतकरी उपलब्ध असणारे पाणी पिकांना देत आहे. परंतु अनेकदा रोहित्र जळाल्याने पिके विजेअभावी करपू लागतात.

Havaman Andaj । मोठी बातमी! वातावरण बदलले, या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; IMD ने जारी केला वादळाचा इशारा

वारंवार विनवणी करूनही रोहित्र (Transformer) दुरुस्त केले जात नाही. परंतु आता शेतकऱ्यांची ही अडचण दूर होणार आहे. डीपी जळाली किंवा बिघडली तर आता त्या जागी लवकरात लवकर नवीन डीपी बसवण्यात येणार आहे. याच संदर्भात महावितरणकडून राज्यभर मोहीम सुरू करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

Corn Crop Management । मका लागवड करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, मिळेल भरघोस उत्पादन

समजा एखाद्या गावातला डीपी जळाला तर त्या गावातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. नवीन डीपी बसवण्यास काही वेळा उशीर होतो. यावर आता तोडगा काढण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांना नादुरुस्त डीपीबाबतची माहिती १८०० २१२ ३४३५ किंवा १८०० २३३ ३४३५ या टोल फ्री क्रमांकावर आणि मंडलस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी लागेल, असे महावितरणने सांगितले आहे.

Organic Vegetables । मस्तच! आता सेंद्रिय भाजीपाला पिकवून मिळवा सरकारी अनुदान, असा घ्या लाभ

करावे लागेल हे काम

ग्राहकांना महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रान्सफॉर्मर जळाल्याची तक्रार करता येईल. शिवाय स्थानिक मंडलस्तरावरील संबंधित कार्यकारी अभियंता यांना ७८७५७६२०१० या नंबरवर माहिती देता येणार आहे. तसेच व्हॉट्सअप नंबरवर जळालेल्या डीपीचा किंवा नादुरूस्त डीपीचा फोटो आणि ठिकाणाचा तपशील देता येईल. नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेतली जाईल.

Cotton Price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पांढऱ्या सोन्याचे वाढले दर, महिन्याभरात होणार आणखी वाढ

तातडीने द्या माहिती

दरम्यान, डीपी बदलणे आणि दुरुस्त करण्याचा आढावा मुख्यालय स्तरावर दररोज घेतला जात आहे. त्यामुळे महावितरणच्या या अनोख्या मोहिमेला यश आले आहे. महावितरणला डीपी खराब झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कमीत कमी तीन दिवसात तो बदलण्यात येत आहे. नागरिकांनी जर याची तातडीने माहिती महावितरणला दिली तर त्यावर यावर लवकरात लवकर काम केले जाते. त्यामुळे डीपी जळाल्याची किंवा खराब झाल्याची माहिती तातडीने द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Success Story । काय सांगता! दोन एकरात 11 प्रकारची पिकं, ही महिला वर्षाला कमावतेय 7 लाख रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *