Agriculture News

Agriculture News । ऐकावं ते नवलंच! केवळ ४ तासात शेतकरी बनला कोट्याधीश, कसं ते जाणून घ्या

बातम्या

Agriculture News । कधी कुणाचं नशीब बदलेल याची कुणालाही खात्री नसते. रातोरात एखादा व्यक्ती करोडपती होतो तर काहीजण करोडोंची कमाई गमावून बसतात. मेहनत नाही तर काही जण नशिबामुळे श्रीमंत बनतात. सध्या अशाच एका शेतकऱ्याची खूप चर्चा होत आहे. तो अवघ्या ४ तासात कोट्याधीश (Millionaire) बनला आहे. आता तुम्हालाही हा शेतकरी कसा करोडपती बनला असेल? असा सवाल मनात आला असेल.

Success Story । आर्थिक स्थितीमुळं 10 वी पर्यंत शिक्षण, आज ‘ही’ महिला शेतीत करतेय 50 लाखांची उलाढाल; संघर्षाची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल

हा शेतकरी पंजाबमधील होशियारपूर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे तो औषध खरेदी केल्याने करोडपती (Farmer millionaire) झाला आहे. होशियारपूर जिल्ह्यातील माहिलपूर शहरातील शीतल सिंह असे या व्यक्तीचे नाव आहे. ते मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने होशियारपूर येथे प्रत्येक आठवड्याला औषध खरेदी करायला येत होते. त्यावेळी त्यांनी ४ नोव्हेंबर रोजी एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले.

Milk Rate | दूध उत्पादकांना मोठा झटका! गायीच्या दुधात ‘इतक्या’ रुपयांनी झाली घसरण, जाणून घ्या नवे दर

त्यांनंतर त्यांना त्याच दिवशी लॉटरी लागल्याचे समजले. परंतु सुरुवातीला त्यांना लॉटरी मालकाच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर त्यांनी आपल्या मित्रांसोबत दोन रात्र आणि एक दिवस घालवल्यानंतर होशियारपूरला गेले. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यांवर देखील विश्वास बसत नव्हता.

Milk Production । पशुपालकांनो, स्वच्छ दूध उत्पादनासाठी घ्या ‘ही’ काळजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *